esakal | पुणे : औषधाच्या कॅप्सूलमधून तिने आणले वीस लाख किंमतीचे सोने!
sakal

बोलून बातमी शोधा

Gold-Seized

अधिकाऱ्यांनी तिच्याकडील साहित्याची तपासणी केली. तेव्हा तिच्याकडे काही औषधी गोळ्या (कॅप्सुल) आढळून आल्या. या गोळ्यांची वैद्यकीय पथकाने तपासणी केली.

पुणे : औषधाच्या कॅप्सूलमधून तिने आणले वीस लाख किंमतीचे सोने!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : दुबईहून विमानाने पुण्यात आलेल्या एका महिला प्रवाशाकडून तब्बल 642 ग्रॅम वजनाचे व तब्बल वीस लाख रुपये किंमतीची सोने केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. संबंधीत महिला भुकटीच्या स्वरुपात सोन्याची तस्करी करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. ही कारवाई रविवारी पहाटे चार वाजता करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मरिअम मोहम्मद सलीम शेख (रा. मुंबई) असे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याविरुद्ध भारतीय सीमाशुल्क कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. रविवारी पहाटे चार वाजता लोहगाव विमानतळावर स्पाईसजेट कंपनीचे दुबईहून आलेले विमान उतरले.

- व्हॅलेंटाइनला गिफ्ट द्यायला तो तिच्या घरात घुसला अन्

या विमानामध्ये एका महिला प्रवाशाकडे तस्करी केलेले सोने असल्याची खबर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार, दुबईहून आलेल्या विमानातून उतरुन एक महिला प्रवासी गडबडीत विमानतळाबाहेर पडण्याच्या प्रयत्नात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी महिलेस थांबवून तिच्याकडे विचारणा केली. तेव्हा तिने मरीअम शेख असे नाव सांगून ती मुळची मुंबईची असल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली.

- 'सारथी'च्या निर्णयाविरोधात जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन 

अधिकाऱ्यांनी तिच्याकडील साहित्याची तपासणी केली. तेव्हा तिच्याकडे काही औषधी गोळ्या (कॅप्सुल) आढळून आल्या. या गोळ्यांची वैद्यकीय पथकाने तपासणी केली. त्यावेळी संबंधीत गोळ्यांमध्ये सोन्याची भुकटी लपविल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, अधिकाऱ्यांनी वीस लाख रुपये किंमतीची 642 ग्रॅम वजनाची सोन्याची भुकटी जप्त केली.

- HSC Exam 2020 : विद्यार्थ्यांनो, परिक्षेला जाताय? वाचा ही महत्वाची बातमी

ही कारवाई सीमाशुल्क विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. संबंधीत महिला तस्करीचे सोने कोणाला देणार होती, यादृष्टीने तिच्याकडे तपास केला जात असल्याचे पतंगे यांनी सांगितले.