Sarthakraj Patil: पहिल्याच प्रयत्नात एनडीएत प्रवेश, आता १,२५० छात्रांचे नेतृत्व; सार्थकराज पाटीलची प्रेरणादायी कामगिरी

Sarthakraj Patil Achieves Remarkable Honour at NDA: पहिल्याच प्रयत्नात एनडीएत प्रवेश; कोल्हापूरच्या सार्थकराजने थेट १,२५० छात्रांचे केले नेतृत्व
NDA Cadet Sarthakraj Patil From Maharashtra Leads 1250 Cadets at Khetarpal Parade Ground in a Proud Moment for Kolhapur

NDA Cadet Sarthakraj Patil From Maharashtra Leads 1250 Cadets at Khetarpal Parade Ground in a Proud Moment for Kolhapur

esakal

Updated on: 

-प्रज्वल रामटेके

पुणे : ‘‘गावातील अनेक घरांतून देशसेवेसाठी सैनिक सैन्यदलात दाखल होतात, त्याच सैनिकांच्या गावातील एका तरुणाने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) ऐतिहासिक खेत्रपाल मैदानावर तब्बल एक हजार २५० छात्रांच्या संचलनाचे नेतृत्व करण्याचा मान मिळवला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील सार्थकराज सागर पाटील याने ही कामगिरी केली. विशेष म्हणजे, एनडीएच्या १५१ व्या तुकडीतील गुणवंत छात्रांमध्ये स्थान मिळवत त्याने राष्ट्रपती रौप्यपदकही पटकावले. त्याच्या या कामगिरीमुळे गावासह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एनडीएच्या ३६४ छात्रांनी रविवारी (ता. २९) ‘अंतिम पग’ ओलांडून देशसेवेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.

Loading content, please wait...