जादा आकारणी करणाऱ्या महा ई सेवा केंद्राला ठोकले सील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

पुणे : दाखला काढण्यासाठी नागरिकांकडून जादा पैसे उकळणाऱ्या महा ई सेवा केंद्रावर तहसीलदारांनी कारवाई सुरू केली असून, मंगळवारी तहसील कार्यालयाच्या जवळ असलेल्या एका महा-ई-सेवा केंद्राला सील ठोकण्यात आले आहे.

पबजीमुळे पुण्यात 16 वर्षाच्या मुलाची आत्महत्या

नागरिकांना उत्पन्न, रहिवाशी, जातीचा दाखला असे विविध दाखले काढण्यासाठी महा-ई-सेवा केंद्रात अर्ज करण्यात येतात. परंतु केंद्रचालकांकडून तिप्पट-चौपट शुल्क आकारणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी तहसीलदार कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या.

पुणे : मार्केटयार्डात राजस्थानी गाजराचा हंगाम सुरू

त्यावरून, पुणे शहर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी महा-ई-सेवा केंद्रांची तपासणी करून त्यात नियमाचे पालन न करणाऱ्या आणि ज्यादा शुल्क वसूल करणाऱ्या महा-ई-सेवा केंद्रावर कारवाई केली. या कारवाईममुळे नागरिकांकडून ज्यादा शुल्क घेणाऱ्या महा-ई-सेवा केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहे.

स्थायीचे अध्यक्षपद रासनेंकडे, तर सभागृह नेतेपदाची माळ घाटेंच्या गळ्यात

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sealed maha e seva center for Overcharges in pune

टॅग्स