स्थायीचे अध्यक्षपद रासनेंकडे, तर सभागृह नेतेपदाची माळ घाटेंच्या गळ्यात

Hemant Rasane is president and Dhiraj Ghate is House leader of standing committee in pune
Hemant Rasane is president and Dhiraj Ghate is House leader of standing committee in pune

पुणे : महापालिकेच्या तब्बल सात हजार कोटी रुपयांच्या तिजोरीच्या अर्थात, स्थायी समितीच्या किल्ल्या नगरसेवक हेमंत रासने यांच्याकडे आल्या आहेत तर, सभागृहनेतेपदाचा मान नगरसेवक धीरज घाटे यांना मिळाला आहे. विशेष म्हणजे, रासने यांच्याकडे स्थायीचे अध्यक्षपद पुढील तेरा महिन्यांसाठी राहणार आहे. दुसरीकडे, स्थायीचे विद्यमान अध्यक्ष सुनील कांबळे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, 'पीएमपी'चे संचालक सिध्दार्थ शिरोळे यांनी मंगळवारी आपल्या पदांचे राजीनामे  महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिले. 

भाजपकडे बहुमत असल्याने महापालिकेतील सारीच पदे याच पक्षाकडे असून, सत्ता स्थापनेला पावणेतीन वर्षे झाल्यानंतर महापौर, उपमहापौरपदासह काही पदाधिकारी बदलण्याची भूमिका भाजप नेतृत्वाने घेतली आहे. महापौरपद, उपमहापौरांपाठोपाठ स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृहनेताही बदलण्यात आला आहे. त्यानुसार रासने, घाटेंच्या नावांची घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ  हे करतील.

#PmcIssue ताडपत्रीखाली काय लपविले आहे सुतार दवाखान्यात

महापालिकेत रासने हे तिसऱ्यांदा निवडून आले असून, गेल्या दोन वर्षांपासून ते स्थायीचे अध्यक्षपद पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, गटातटाच्या राजकारणाचा फटका बसल्याने रासनेंना हे पद मिळू शकले नव्हते. आता मात्र, ही जबाबदार त्यांच्याकडे चालून आली आहे. तर, घाटे हे पहिल्यांदाच निवडून आले असले तरी, त्यांच्यातील आक्रमता आणि 'प्लोअर मॅनेजमेंट'मुळे सभागृह सांभाळण्याचे आव्हान पेलण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.

मिट्ट काळोख्या खोलीत आजीबाईंचं मरणासन्न जिणं (व्हिडिओ)​

रासने आणि घाटे हे दोघे कसबा मतदारसंघातून इच्छुक होते. त्यांच्याऐवजी माजी महापौर मुक्ता टिळक यांना संधी मिळाल्याने रासने, घाटे नाराज होते. या पार्श्‍वभूमीवर या दोघांना ही पदे देण्यात आल्याचे सांगण्यात आले. स्थायी समिती आणि सभागृहनेता ही महत्त्वाची पदे कसबा मतदारसंघात दिल्याने भाजपच्या वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com