esakal | लेकीच्या पहिल्या वाढदिवशी बापानं घेतला गळफास; सिंहगड रस्ता परिसरात आत्महत्यांच्या घटना

बोलून बातमी शोधा

Crime_Suicide}

मुलीच्या वाढदिवसादिवशी दिक्षीवंत यांनी आत्महत्या केल्याने कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस अधिक तपास करीत आहेत.

लेकीच्या पहिल्या वाढदिवशी बापानं घेतला गळफास; सिंहगड रस्ता परिसरात आत्महत्यांच्या घटना
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धायरी (पुणे) : सिंहगड रस्ता परिसर रविवारी आत्महत्यांच्या घटनांनी चर्चेत राहिला. वडगाव खुर्द येथील अभिरुची मॉल परिसरातील महावितरणच्या कार्यालयात रविवारी (ता.२८) सकाळी महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाने गळफास घेऊन आत्महत्या केली. उमेश प्रकाश दिक्षीवंत (वय ३२, रा. फिनोलेक्स कॉलनी, काळेवाडी, पुणे, मूळ पत्ता- हनुमान मंदिराजवळ, भुसणी, उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर कर्मचाऱ्याने लोखंडी पाईपास दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला असून कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

Video: संजय राठोडांचा राजीनामा घेतला, मग गुन्हा का दाखल केला नाही? पूजाच्या आजीचा सवाल​

मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील असणारे उमेश दिक्षीवंत हे कोल्हापूरवरून मागील दोन वर्षांपूर्वी बदली होऊन महावितरणच्या धायरी शाखेत रुजू झाले होते. दिक्षीवंत यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून ते काळेवाडी परिसरात आपल्या पत्नीसमवेत राहत होते. त्यांना एक वर्षाची मुलगी असून तिचा रविवारी पहिला वाढदिवस होता. मुलीच्या वाढदिवसादिवशी दिक्षीवंत यांनी आत्महत्या केल्याने कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पुणे : कॅनॉलमध्ये बुडाल्याने एकाचा मृत्यू; धायरी फाटा येथील घटना​

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील अभिरुची परिसर येथील महावितरणच्या कार्यालयात सकाळच्या सुमारास एकाने गळफास घेतल्याची माहिती एका महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सिंहगड रस्ता पोलिसांना कळविली होती. उमेश दिक्षीवंत हे महावितरणच्या धायरी शाखेत कार्यरत होते. सध्या त्यांची रात्रपाळीत ड्युटी असल्याने ते नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री ११ वाजता कामावर हजर झाले होते. नेहमीप्रमाणे इतर कर्मचारी कामात मग्न असताना दिक्षीवंत हे कार्यालयाशेजारी असणाऱ्या गोडावूनमध्ये गेले.

Video: 'दुआओं मे याद रखना'; आएशानं हसतहसत मरणाला कवटाळलं!​

सकाळी सातच्या दरम्यान एक कर्मचारी गोडाऊनमध्ये काही कामानिमित्त जात असताना त्यांना आतून दरवाजा बंद असल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी आवाज दिला असता दिक्षीवंत यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्यांच्या सहकाऱ्याने खिडकीतून पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठांना याबाबत माहिती कळविली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांनी छताला असणाऱ्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)