
दरवाजात दोन पोलिसांना बघून जनुभाऊंना एकदम हायसे वाटले. गेल्या कित्येक दिवसांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहू लागला. ‘तुम्ही चहा घेऊन आला असालच’ किंवा ‘चहा आणू का’? असे काहीही न म्हणता जनुभाऊंनी बायकोला दोन कप चहा आणण्यास सांगितले. क्षणभरातच लॉकडाउनच्या काळातील घरफोडीची घटना त्यांच्या डोळ्यासमोर आली.
दरवाजात दोन पोलिसांना बघून जनुभाऊंना एकदम हायसे वाटले. गेल्या कित्येक दिवसांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहू लागला. ‘तुम्ही चहा घेऊन आला असालच’ किंवा ‘चहा आणू का’? असे काहीही न म्हणता जनुभाऊंनी बायकोला दोन कप चहा आणण्यास सांगितले. क्षणभरातच लॉकडाउनच्या काळातील घरफोडीची घटना त्यांच्या डोळ्यासमोर आली. चोरट्यांनी त्यांच्या घरातील एक लाख रुपये रोख व पंधरा तोळे सोन्याचे दागिने लांबवले होते. या घटनेची फिर्याद त्यांनी पोलिस ठाण्यात दिली होती. चौकशीत काय प्रगती झाली, असे विचारण्यासाठी ते अधून- मधून पोलिस ठाण्याची पायरी चढत होते. ‘तुमच्याकडे एवढे पैसे व दागिने आलेच कोठून? आधी उत्पन्नाचे स्रोत सांगा?’
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
‘पेमेंट स्लीप आणा’, ‘दागिने खरेदीच्या पावत्या दाखवा,’ असे सांगून विविध कागदपत्रे जमा करण्यास पोलिसांनी त्यांना सांगितले. त्यानंतर ‘आम्हाला एवढंच काम आहे का’? ‘दोन दिवसांनी या,’ असेही त्यांना ऐकून घ्यावे लागायचे. एकदा तर एका पोलिस अधिकाऱ्याने जनुभाऊंना पाहताच, ‘सापडले का तुम्हाला चोर,’ असा उलटा प्रश्न विचारला. त्यावर जनुभाऊ म्हणाले, ‘‘साहेब, हा प्रश्न मी विचारायला हवा ना,’’ असे म्हटले. त्यावर ते अधिकारी म्हणाले, ‘‘अहो, हल्ली फिर्यादीलाच चोर बरोबर सापडतात.
खंडणी मागत व्यावसायिकांना केली मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल
पोलिसांना सापडले तर आधी मार बसतो आणि नंतर हप्ता चालू...’’ असे म्हणताच त्या अधिकाऱ्याने जीभ चावली. ‘चोरटे नक्की सापडतील, तुम्ही संयम सोडू नका,’ असे म्हणत जनुभाऊंची त्यांनी बोळवण केली. त्यानंतर कित्येक दिवसांनंतर दारात पोलिस आल्याचे पाहून त्यांना आनंद झाला. घरफोडीतील आरोपींना पकडले असेल व ऐवज नेण्यासाठीच बोलावले असेल, असे त्यांना वाटले. पोलिस आतमध्ये आल्यानंतर त्यांनी जनुभाऊंच्या हातात समन्स दिले. ‘भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार संचार मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल असून, याबाबतचे हे समन्स आहे.’ एका पोलिसाने ही माहिती दिली.
Video: अयोध्येतील राममंदिरासाठी राज्यपालांचं दगडूशेठ गणपतीला साकडं!
‘लॉकडाउनमध्ये माझ्या घरी झालेल्या घरफोडीची माहिती देण्यासाठी मी दोन- तीन वेळा पोलिस ठाण्यात गेलो होतो. तेवढ्या एकाच कारणासाठी मी घराबाहेर पडलो होतो.’’
‘कारणं काही असली तरी तुम्ही कायदा मोडलाय.’ पोलिसाने ठामपणे म्हटले.
‘शहरातील चोऱ्या, दरोडे, खून असे गंभीर गुन्हे घडायचे थांबले का? माझ्या घरफोडीच्या प्रकरणाचे काय झाले’? असे प्रश्न त्यांनी विचारले. मात्र, जे काय सांगायचे ते कोर्टात सांगा, असे उत्तर पोलिसांनी दिले. तेवढ्यात जनुभाऊंनी स्वयंपाकघराकडे पाहत म्हटले, ‘अगं चहा कॅन्सल कर बरं का’!
Edited By - Prashant Patil