

सोमेश्वरनगर, ता. १३ : येथील परिसरातील बुधवारी (ता.१३) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वळवाच्या पहिल्याच पावसाने शेतकरी सुखावला.
आज दिवसभर तप्त उन्हाने पावसाच्या आगमनाची चाहूल दिली होती. सायंकाळी सहा वाजता विजांचा गडगडाट, वादळी वारे यासोबत पावसाचे आगमन झाले. करंजेपुल, वाघळवाडी, वाणेवाडी, सोरटेवाडी, होळ, आठफाटा, वाकी-चोपडज, निंबुत या परिसरात समाधानकारक पाऊस कोसळला. वीज बराच काळ गायब झाली होती. दरम्यान, एक तास कोसळलेल्या या वादळी पावसाने शेतात उभ्या असलेल्या फळभाज्या, पालेभाज्या या पिकांना फटका बसला. ऊस, मका, कडवळ याला फायदा झाला.
सरपंच हेमंत गायकवाड, शेतकरी गणेश ठोंबरे म्हणाले की, पावसाने पेरू, आंब्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र शेतात उभ्या असलेल्या उसाला जिवदान मिळाले आहे. चारा पिकांना फायदा होणार आहे. हा पाऊस गरजेचा होता.