Student Protest: ‘भविष्य वाचवण्यासाठी दिल्ली गाठली’; पुण्यातील २०० विद्यार्थी ‘चलो संसद’ आंदोलनात सहभागी

पेपरफुटी, शिक्षणाचे खासगीकरण आणि बेरोजगारीविरोधात पुण्यातील विद्यार्थ्यांचा दिल्ली गाठून जंतर-मंतरवर ‘चलो संसद’ आंदोलनात निर्णायक लढा
The AISF-led protest demands strict action against examination irregularities, the dissolution of NTA and reforms to protect students' futures.

The AISF-led protest demands strict action against examination irregularities, the dissolution of NTA and reforms to protect students' futures.

Sakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : ‘‘आमचे भविष्य वाचवण्यासाठी आम्ही पदरमोड करून दिल्लीची वाट धरली आहे. सर्वांना साधे रेल्वेचे आरक्षणही मिळाले नाही, तरीही सामान्य डब्यातील तोबा गर्दीत, अक्षरशः तासन्‌तास उभे राहून आम्ही प्रवास केला आहे. हा लढा केवळ आमच्या हक्कांचा नाही, तर आमच्या अस्तित्वाचा आणि भविष्याचा आहे. याच संघर्षाला निर्णायक बळ देण्यासाठी आम्ही थेट दिल्लीत धडक दिली आहे,’’ अशी उद्विग्न भावना पुण्याहून दिल्लीला पोचलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com