विद्यार्थी म्हणताहेत, 'मायबाप सरकार आमच्याकडे लक्ष देणार का?'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020


पुण्यात स्पर्धा परीक्षा व इतर शिक्षण घेणारे सुमारे ३ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी अडकून पडले आहेत. पुण्यातील कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याने लाॅकडाऊन केव्हा संपले याचा अंदाजा नाही. ज्या संस्था विद्यार्थ्यांना गेल्या महिनाभरापासून दोनवेळा जेवण पुरवत होत्या, त्यांची ही आर्थिक क्षमता संपत आली असून, ३ मे पर्यंतचे त्यांचे नियोजन आहे.

पुणे : कोटा येथे अडकलेले विद्यार्थी महाराष्ट्रात परतण्याची चिन्ह निर्माण झालेले असताना,  पुण्यात रहाणाऱ्या विद्यार्थांनी सरकार आमच्यासाठी काही करणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गेल्या महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासून जेवण पुरविणाऱ्या संघटनांची क्षमता संपत आल्याने या विद्यार्थां समोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात स्पर्धा परीक्षा व इतर शिक्षण घेणारे सुमारे ३ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी अडकून पडले आहेत. पुण्यातील कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याने लाॅकडाऊन केव्हा संपले याचा अंदाजा नाही. ज्या संस्था विद्यार्थ्यांना गेल्या महिनाभरापासून दोनवेळा जेवण पुरवत होत्या, त्यांची ही आर्थिक क्षमता संपत आली असून, ३ मे पर्यंतचे त्यांचे नियोजन आहे. यासाठी बाहेरून मदत मिळणे ही अवघड झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने ३ मे पर्यंत पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना गावाकडे जाण्यासाठी व्यवस्था करावी असे, अशी मागणी केली जात आहे. 
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, राजस्थानात कोटा येथे जेइइ व नीटच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक गहलोत यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे लवकरच हे विद्यार्थी स्वगृही परत येतील. एकीकडे ही तयारी सुरू असताना पुण्यात रहाणार्या विद्यार्थ्यांकडे दूर्लक्ष का असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. 

लॉकडाऊन सुरुच राहणार; दिलासा नाहीच

प्रिया मुंढे म्हणाल्या, ''अनेक विद्यार्थी पुण्यात अडकलेले आहेत, त्यांना गावाकडे जाण्यासाठी सरकारने व्यवस्था केली पाहिजे. पुण्यात स्थिती गंभीर होत असल्याने कधी कोणाला लागन होईल याची शाश्वती नाही."

फुलविक्रेत्याची अशीही माणुसकी; अंत्यसंस्कारासाठी...
बबन दाडगे म्हणाला, "आम्ही पुण्यात अडकल्याने घरचे चिंतेत आहेत. पुण्यातून आरोग्य तपासणी केल्यानंतर गावाकडे गेल्यावर १५ दिवस सक्तीचे करण्यास आम्ही तयार आहोत. कोटाचे विद्यार्थी येऊ शकतात, तर सरकारने आमची ही व्यवस्था केली पाहिजे. 
एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे म्हणाले, " विद्यार्थ्यांसाठी जेवण पुरविण्यासाठी ३ मे पर्यंतचे नियोजन आहे. पण यापुढे मदत करणे अवघड जात आहे. सरकारने विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्यावी. जसे कोटाचे विद्यार्थी स्वगृही परत येत आहेत, तसे या विद्यार्थांची सोय करावी. 

पुणे जिल्ह्यातील अंगणवाडीच्या बालकांसाठी मोठा निर्णय! 
मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव म्हणाले, "विद्यार्थ्यांना महिनाभर जेवण पुरविले आहे. यापुढे जेवण देताना त्यात काटकसर करावी लागेल. विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत यासाठी राज्य सरकारने या विद्यार्थ्यांची गावकडे जाण्याची सोय केली पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student stuck in pune during lockdown asking government will look after us or not