पुणे : 'या' शाळांतील विद्यार्थी अजूनही गणवेशाच्या प्रतीक्षेत!

School
School

पुणे कॅन्टोन्मेंट : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळेचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार ते पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अद्यापही गणवेश नसल्याने विद्यार्थी आणि पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या ठेकेदारांमार्फत विद्यार्थ्यांची गणवेशाची मापे घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही स्थिती पाहता विद्यार्थ्यांना अजून गणवेशासाठी किती काळ वाट पाहावी लागणार आहे? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत. यावेळी अनेक पालकांना गणवेश आणि आदी शालेय साहित्य सहजासहजी विकत घेणं शक्य होत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी बोर्ड प्रशासनाकडून दोन गणवेश, शूज, सॉक्स, थंडीसाठी स्वेटर, पावसाळ्याच्या दिवसांसाठी रेनकोट अशा वस्तू मोफत देण्यात येत असतात. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांपासून या विद्यार्थ्यांना कधीच वेळेवर गणवेश मिळाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अत्यंत जीर्ण झालेले गणवेश परिधान करून शाळेमध्ये यावे लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे.

विविध वॉर्डामध्ये बोर्डाच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये दहावीपर्यंत शिक्षण देण्याची सोय आहे. मागील अनेक वर्षांपासून या शाळा सुरळीतपणे सुरू असून, सुमारे पाच ते सहा हजार विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना गणवेश का मिळाले नाहीत? याबाबत मात्र कोणीही आवाज उठवत नाही. त्यामुळे गणवेश देण्याची प्रक्रिया कायम रखडत जात आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू होतानाच गणवेश मिळतील अशी घोषणा दरवर्षी करीत असते. मात्र, नेमके याच घोषणेला हरताळ लावण्याचे काम बोर्ड प्रशासन करीत आहे. याही वर्षी अजूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत. सध्या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी आवश्यक असलेली मापे घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नक्की केव्हा गणवेश मिळणार याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

''या वर्षी थोडा उशिरा प्रस्ताव दाखल झाला आहे. त्यामुळे गणवेशाची प्रक्रिया रेंगाळली आहे. मात्र, पुढील काही दिवसात काम प्रगतीपथावर येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची व्यवस्था करण्यात येईल.''
- अमित कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com