esakal | धक्कादायक : जुन्नरमध्ये विवाहितेची दीड वर्षांच्या मुलीसह आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक : जुन्नरमध्ये विवाहितेची दीड वर्षांच्या मुलीसह आत्महत्या

धक्कादायक : जुन्नरमध्ये विवाहितेची दीड वर्षांच्या मुलीसह आत्महत्या

sakal_logo
By
रवींद्र पाटे

नारायणगाव : हिवरे तर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथील विवाहितेने दीड वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. वंशाला दिवा पाहिजे म्हणून दुसऱ्या लग्नास विरोध केल्याने या विवाहीतेचा शारीरिक, मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी विवाहितेचा पती, दीर, सासू व सासरा आशा चार जणांना अटक केली आहे, शी माहिती पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव हिंगे पाटील यांनी दिली. या प्रकरणी विवाहीतेचा पती अविनाश बंडू तांबे, दीर संतोष बंडू तांबे, सासरा बंडू लक्ष्मण तांबे, सासू बायडाबाई बंडू तांबे यांना अटक केली आहे.

हेही वाचा: SET अर्जासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मुदत वाढ

या बाबत पोलीस उपनिरीक्षक हिंगे पाटील म्हणाले ढवळपुरी( ता. पारनेर) येथील बुधा ठवरे यांची कन्या रंजना हीचा विवाह १५ एप्रिल २००९ रोजी हिवरे तर्फे नारायणगाव येथील देवजाळी शिवारातील अविनाश तांबे याच्याशी झाला होता. त्यांना सुप्रिया(वय ४),श्रीशा( वय दीड वर्ष) या दोन मुली झाल्या होत्या. वारसदार व वंशाला दिवा म्हणून मुलगा पाहिजे या साठी अविनाश याने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.दुसऱ्या लग्नास संमती द्यावी यासाठी अविनाश याने रंजना हिच्याकडून जबरदस्तीने करारानामा लिहून घेतला होता. मात्र दुसऱ्या लग्नास पत्नी रंजना व तिचे वडील बुधा ठवरे यांचा विरोध होता. रंजना हिला मुली असल्याने व विवाहास विरोध करत असल्याने आरोपी रंजना हिचा शारीरिक, मानसिक छळ करत होते. या बाबतची माहिती रंजना हिने वडील बुधा ठवरे यांना प्रत्यक्ष भेटून व वेळोवेळी मोबाईल द्वारे दिली होती. या मुळे अविनाश याने पत्नी रंजना हीचा मोबाईल फोडून टाकला होता .८ जून रोजी आरोपींनी रंजना हिला मारहाण केली होती. सततच्या छळाला कंटाळून व पतीने दुसरे लग्न करण्याचा घेतलेला निर्णय या मुळे रंजना हिने ९ जून २०२१ रोजी सायंकाळी हिवरे तर्फे नारायणगाव हद्दीतील शिवहरीनगर शिवारातील पोपट घुले यांच्या विहीरीत दीड वर्षाची मुलगी श्रीशा हिच्यासह उडी मारून आत्महत्या केली.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये २४४ नवीन रुग्ण; आज ३३९ जणांना डिस्चार्ज

या बाबतची फिर्याद बुधा ठवरेयांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली होती. नारायणगाव पोलिसांनी आरोपींना अटक करून आज दुपारी जुन्नर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद हिवरे तर्फे नारायणगाव परिसरात उमटले.या घटनेचा निषेध करण्यासाठी रंजना हिच्या नातेवाईकांनी अविनाश तांबे याच्या घरा समोर अंत्यविधी केला.

हेही वाचा: पुणे : महात्मा फुले मंडईत आग