

Four-Day Fight Ends in Tragedy; Husband Faces Police Custody After Wife's Death
sakal
लोणी काळभोर: चारित्र्याच्या संशयातून पतीने डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केलेल्या शीतल शरद वारे (वय ३४) यांचा सोमवारी (ता. ८) उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी फरार पती शरद विठ्ठल वारे (वय ३७, रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती) याला अहिल्यानगर जिल्ह्यातून अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.