राजू शेट्टींनी आमदारकी स्वीकारायची की नाही, हे कोण ठरविणार?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान परिषदेची उमेदवारी स्वीकारण्याचा आग्रह केला आहे.

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या आमदारकीचा स्वीकार करायचा की नाही याचा निर्णय २० जून रोजी होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत होणार आहे, असे पक्षातर्फे प्रकाश पोफळे यांनी गुरुवारी (ता.१८) रात्री स्पष्ट केले.

- २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळाला; वाचा सविस्तर!

राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान परिषदेची उमेदवारी स्वीकारण्याचा आग्रह केला आहे. तसेच पवार यांनी विनंती केल्यानंतर राजू शेट्टी यांनी बारामतीमध्ये पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. परंतु त्या बाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे.  या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना, या बाबतचा निर्णय घेणार असल्याचे पक्षातर्फे पोफळे यांनी स्पष्ट केले आहे.

- 'राजकीय व्यवस्थेचे दुर्लक्ष होत असेल तर...'; काय म्हणाले राज्य सरकारचे निवृत्त प्रधान सचिव?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे असे सांगण्यात आले आहे की, शेट्टी यांनी  आमदारकी स्वीकारायची की नाही याचा निर्णय ते स्वतः घेऊ शकत नाही. पक्षाची कोअर कमिटी याबाबतचा निर्णय घेईल. त्यासाठी पक्षाची बैठक येत्या 20 जून रोजी होणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल. शेट्टी यांनी उमेदवारी स्वीकारावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह मोठया प्रमाणात असला तरी सर्व प्रकारची चर्चा करून पक्ष निर्णय घेईल, असे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पक्ष विस्तारासाठी आवश्यक असलेली पावले पक्ष नक्कीच उचलेल आणि त्यासाठी कोअर कमिटी अंतिम निर्णय घेणार आहे, असेही पोफळे यांनी सांगितले आहे.

 - पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकास ६ दिवसांची पोलिस कोठडी; घराची झडती सुरू!

भारतीय जनता पक्षाबरोबर काही काळ असलेले, शेट्टी लोकसभा निवडणुकीस्वतंत्रपणे लढले. परंतु, निवडणुकीत पराभूत झाल्यावर ते काही काळ शांत होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेची आमदारकीची ऑफर दिल्यापासून महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimani Shetkari Sanghatana will decide whether Raju Shetty will accept the MLA post or not