Corona Update - पुणेकरांना दिलासा! सलग तिसऱ्या दिवशी रिकव्हरी रेट जास्त

गजेंद्र बडे
Tuesday, 29 September 2020

सलग तिसऱ्या दिवशी दिवसभरातील एकूण नवीन कोरोना रुग्णांपेक्षा दिवसभरात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे पुणेकरांसाठी थोडासा दिलासादायक बातमी आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.29) दिवसभरात एकूण 2 हजार 453 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी दिवसभरातील एकूण नवीन कोरोना रुग्णांपेक्षा दिवसभरात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे पुणेकरांसाठी थोडासा दिलासादायक बातमी आहे. आज 3 हजार 748 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील 1 हजार40 जण आहेत. याशिवाय गेल्या चोवीस तासांत 87 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये 684, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 557, नगरपालिका क्षेत्रात 139 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 33 नवे रुग्ण सापडले आहेत.

राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ

मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 40 रुग्ण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 16, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 22, नगरपालिका क्षेत्रातील 8 आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही काल (ता.28) रात्री 9 वाजल्यापासून आज (ता.29) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

सिंहगड कोविड केअर सेंटरमध्ये 'ती' गेल्या सहा महिन्यांपासून लावतेय जिवाची बाजी

कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 1 हजार 548, पिंपरी चिंचवडमधील 806, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 1 हजार 89, नगरपालिका क्षेत्रातील 274 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 31 जण आहेत.

मागील साडेसहा महिन्यांपासून आजतागायत जिल्ह्यातील एकूण 6 हजार 446 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये शहरातील सर्वाधिक 3 हजार 595, पिंपरी चिंचवडमधील 1 हजार 306, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 1 हजार 10, नगरपालिका क्षेत्रातील 361 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 174 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 258 रुग्ण आहेत.

35 व्या वर्षी केला गुन्हा आणि 55 व्या वर्षी सापडला

जिल्ह्यातील तीन दिवसांतील कोरोना स्थिती
- वार --- एकूण टेस्ट --- नवे रुग्ण --- कोरोनामुक्त --- झालेले मृत्यू
- रविवार --- 13 हजार 246 --- 3313 --- 3894 --- 80.
- सोमवार --- 9 हजार 543 --- 1945 --- 3130 --- 59.
- मंगळवार --- 12 हजार 830 --- 2453 ---3748--- 87.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: third day more corona free than patients in Pune today