वाहतूक पोलिसाला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

फिर्यादी पवार हे दिघी-आळंदी वाहतूक विभागात कार्यरत आहे. शुक्रवारी (ता. 15) दुपारी पावणे तीनच्या सुमारास ते देहू फाटा येथे कर्तव्यावर असताना अलकुंडे चालवित असलेल्या ( एम एच 12 , आर पी 7888) या क्रमांकाच्या रिक्षामधील व्यक्तीबाबत संशय आल्याने रिक्षा थांबविण्यासाठी फिर्यादी पवार यांनी शिटी मारली. त्यावेळी रिक्षात पॅसेंजर सीटवर बसलेल्या आरोपी राहुल पवार याने फिर्यादीला शिवी देत आरोपी चऱ्होली फाटा चौकाच्या दिशेने पसार झाले.

पिंपरी : शिवीगाळ केल्याचा जाब विचारणार्‍या वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकासह दोघांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना चऱ्होली येथील चोविसावाडी येथे घडली.

महाशिवआघाडी झाली तरीही पुण्यात भाजपचेच वर्चस्व

या प्रकरणी मोहन नानू पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल ऊर्फ पप्पू पुनाजी पवार (वय 32) , गणेश यल्लपा अलकुंडे (वय 30, दोघेही रा. वाडारवाडी, शिवाजीनगर, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू

फिर्यादी पवार हे दिघी-आळंदी वाहतूक विभागात कार्यरत आहे. शुक्रवारी (ता. 15) दुपारी पावणे तीनच्या सुमारास ते देहू फाटा येथे कर्तव्यावर असताना अलकुंडे चालवित असलेल्या ( एम एच 12 , आर पी 7888) या क्रमांकाच्या रिक्षामधील व्यक्तीबाबत संशय आल्याने रिक्षा थांबविण्यासाठी फिर्यादी पवार यांनी शिटी मारली. त्यावेळी रिक्षात पॅसेंजर सीटवर बसलेल्या आरोपी राहुल पवार याने फिर्यादीला शिवी देत आरोपी चऱ्होली फाटा चौकाच्या दिशेने पसार झाले. त्यांनतर फिर्यादी पवार यांनी पाठलाग करून त्यांना चोविसवाडी येथे थांबवून शिवी दिल्याचा जाब विचारला. त्यांनतर आरोपी राहुल पवार याने रिक्षातून खाली उतरून फिर्यादीला धक्काबुक्की करीत मारहाण केली. तसेच रिक्षाचालक अलकुंडे याने देखील फिर्यादीला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देत पसार झाला. राहुल पवार याला अटक केली आहे. 

धक्कादायक! पिंपरीत तरुणीवर बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न 
पुणेकरांनो चला! हिंजवडीपासून 45 मिनिटांवर आहे स्वर्ग... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threatened to kill a traffic policeman in pimpri