पुण्यातील टेमघर धरणासह राज्यातील तीन हजार धरणे...

dam.jpg
dam.jpg

खडकवासला (पुणे) : जलसंपदा विभागाने राज्यातील लहान- मोठ्या तीन हजार तीन धरणाची पावसाळ्यापूर्वीची सुरक्षा तपासणी केली. यामध्ये राज्यातील पुण्यातील टेमघरसह 
सर्व धरण पूर्णपणे सुरक्षित आहे, अशी माहिती जलसंपदाचे लाभ क्षेत्र विभागाचे सचिव राजेंद्र पवार यांनी दिली.

देशात मान्सून कधी येणार पावसाचे नवीन वर्ष सुरू होणार आहे. ऑगस्ट 2019मध्ये सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची होती. त्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यातील जलसंपदा विभागाने पावसाळ्यापूर्वीची तयारी पूर्ण केली आहे. जलसंपदा विभागाच्या कोथरूड येथील जलसंपदा भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

पूर नियंत्रण कक्ष स्थापन करणे 
तापी, कृष्णा, गोदावरी , कोकण, विदर्भ अंतर्गत खोरे निहाय व उपखोरे निहाय पूर नियंत्रण कक्ष एक जून 2020 पासून २४x७ स्थापन करण्यात आले आहेत..

महाराष्ट्राच्यालगत असलेल्या राज्यात समन्वय- 
आंतरराज्य प्रकल्पांसाठी संपर्कासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच, मंत्रालयात आपत्कालीन यंत्रणेचा कक्ष एक जून पासून सुरु करण्यात होणार आहे.

मान्सून पूर्वतयारी बैठका- 
- राज्य, प्रदेश, जिल्हा स्तरावर पूर्व तयारी बैठक झाली आहे.
- मागील वर्षी रेल्वे पुरात अडकली होती. त्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी रेल्वे बाधित प्रकल्पाच्या संदर्भात बैठक झाली आहे.
- आंतरराज्य प्रकल्पाच्या संदर्भात बैठक २८ मे रोजी मा. अतिरीक्त मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली झाली आहे. त्यावेळी तेलंगना, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात राज्यातील प्रतिनिधी सहभागी झाले होते.

जल शास्त्रीय निरीक्षण केंद्र- 
-पर्जन्य मापक यंत्रे व नदी प्रवाह मापक यंत्रे यांची तपासणी करून ती कार्यान्वित केली आहे
-केंद्रीय जल आयोग यांच्या निरीक्षण केंद्रासमवेत 

धरण सुरक्षा तपासणी-
-राज्यातील २०% धरणांची civil mechanical electrical component ची पावसाळा पूर्व तपासणी झाली आहे. गंभीर धोका असलेले एकही धरण नाही.
-सर्व द्वारयुक्त धरणांचा अद्ययावत प्रचलन आराखडा ROS व द्वार प्रचलन आराखडा GOS तयार करण्यात आला आहे.
-कृष्णा खोरे प्रत्यक्ष वेळीची माहिती संकलन प्रणाली RTDAS

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com