लाईव्ह न्यूज

इंदापुरात भैरवनाथांची यात्रा उत्साहात

इंदापुरात भैरवनाथांची यात्रा उत्साहात
Published on: 

इंदापूर, ता. १९ : इंदापूर शहरातील जागृत देवस्थान असलेल्या भैरवनाथाची यात्रा गुरुवारी (ता. १७) पार पडली. यावेळी गुलालाची उधळण करण्यात आली. तर ‘भैरवनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने शहर दुमदुमले होते. यात्रेसाठी इंदापूर शहर आणि तालुक्यासह अकलूज, पंढरपूर, बारामती, पुणे, टेंभुर्णी, सोलापूर या पंचक्रोशीतील भक्तांनी कुलदैवत भैरवनाथाचे दर्शन घेतले.
सायंकाळी ६ वाजता भैरवनाथांची आरती होऊन नाथांच्या घोड्याचा छबिना ग्राम प्रदक्षिणेसाठी सवाद्य मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. यात्रेचे नियोजन भैरवनाथ देवस्थान कमिटीच्या वतीने नियोजन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com