लाईव्ह न्यूज

पृथ्वीराज जाचकांनी यांनी बजावला मतदाना हक्क

पृथ्वीराज जाचकांनी यांनी बजावला मतदाना हक्क
Published on: 

काटेवाडी, ता. १८ : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी टकलेवस्ती (लासुर्णे, ता. इंदापूर) येथे जय भवानी माता पॅनेलचे प्रमुख पृथ्वीराज जाचक यांनी मतदान केले. सर्वसामान्य मतदारांप्रमाणे जाचक यांनी सपत्नीक रांगेत उभा राहून मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी माध्यमांशी बोलताना जाचक म्हणाले, मी सुद्धा लोकशाहीचा एक भाग आहे. उमेदवार असलो म्हणून इतर मतदारांपेक्षा मला वेगळे अधिकार नसतात. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांप्रमाणेच मीही एक मतदार आहे. मी लोकशाही मानणारा आहे. त्यामुळे रांगेत उभा राहूनच मतदान केले. या निवडणुकीमध्ये प्रथमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत पृथ्वीराज जाचक यांनी सर्वपक्षीय पॅनल निवडणुकीसाठी उभा केला. पृथ्वीराज जाचक यांना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा देखील या निवडणुकीसाठी पाठिंबा मिळाला.
00898

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com