
पुणे, ता. १२ : बडोद्या येथील छत्रपती शिवाजी सहकारी मंडळीच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार २०२३ हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर प्रतिष्ठानला तंजावरचे महाराज बाबाजीराजे भोसले, फलटणचे शिवरूपराजे निंबाळकर, गुजरातचे माजी मंत्री राजेंद्र त्रिवेदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. वीर बाजी पासलकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ पासलकर, वैजयंतीराजे पासलकर व अविनाश पासलकर यांनी पुरस्काराचा स्वीकार केला.
स्वराज्यासाठी योगदान दिलेल्या सरदारांच्या व मावळ्यांच्या वंशजांना संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष गौरव पवळे, डॉ. सुवर्णा निंबाळकर, समीर इंदलकर, संतोष इंदलकर, जयाजी मोहिते, सयाजी गुजर, प्रथमेश बांदल, अदित्या बांदल, अमरसिंह जाधवराव, रवींद्र कंक, शीतल मालुसरे, आनंद काशिद, नीलेश देशपांडे, संदीप पोतनीस, विनायक केसरकर आदी वंशजांचा समावेश होता. पुरस्कार सोहळ्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची रथात मिरवणूक काढण्यात आली. पवळे यांनी संयोजन केले होते.
फोटो PNE23T17830
बडोदा : राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार सोहळ्याप्रसंगी (डावीकडून) अविनाश पासलकर, शिवरूपराजे निंबाळकर, महाराज बाबाजीराजे भोसले, गौरवजी पवळे, वीर बाजी पासलकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ पासलकर, वैजयंतीराजे पासलकर व आदी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.