पुण्यातील भिडेवाड्यासाठी होणार मशाल मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

भिडे वाड्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, यासाठी 'मशाल मोर्चा' काढण्यात येणार आहे. हा मोर्चा शुक्रवारी (ता.20) गंज पेठेतील महात्मा फुले वाडा ते बुधवार पेठीतील भिडे वाडा असा काढण्यात येणार आहे, अशी माहिती आई सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत दिली.

पुणे : सरकारने भिडे वाड्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, यासाठी 'मशाल मोर्चा' काढण्यात येणार आहे. हा मोर्चा शुक्रवारी (ता.20) गंज पेठेतील महात्मा फुले वाडा ते बुधवार पेठीतील भिडे वाडा असा काढण्यात येणार आहे, अशी माहिती आई सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यात मोबाईल फेकून मारल्याने फुटले महिलेचे डोकं 

महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा ज्या ठिकाणी सुरू केली होती, त्या भिडेवाड्यास (श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरा समोर) राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून घोषित करावे, अशी मागणी समितीने केली आहे. यासाठी समितीकडून येत्या शुक्रवारी (ता.20) मशाला मोर्चाचे आयोजन केले आहे.

नजरेला नजर भिडताच झाला राडा; शाहरुखने दिली तक्रार

हा मोर्चा गंज पेठेतील महात्मा फुले वाडा ते बुधवार पेठीतील भिडे वाडा असा काढण्यात येणार आहे. या वेळी समितीचे कल्याण जाधव, अमर हजारे, गोविंद डाके, छाया भगत, रुपाली पाटील आदी उपस्थित होते.

पुणे : लोणीकंद तलावात आढळले दोन मृतदेह


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Torch march for Bhidewada National Monument in pune