जागा मालकांनी दुकान भाड्यानी द्यायला काढली कारण... 

शीतल बर्गे 
सोमवार, 29 जून 2020

बाणेर, बालेवाडीतील दुकान व्यावसायिकांनी जागेचे भाडे परवडत नसल्याने थेट व्यवसायच बंद केला. त्यामुळे येथील जागा मालकांनी जागा इतर व्यावसायिकांना भाड्याने देण्यासाठी काढली आहे.

बालेवाडी (पुणे) : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लॉकडाउनमुळे हॉटेल व्यावसायिक, कापड व वाहनविक्रेते अडचणीत आले आहेत. जागेचे भाडे, वीज बिल, कर्मचाऱ्यांचा पगार आदी खर्च परवडत नसल्याने बाणेर, बालेवाडीमधील काही जागा मालकांनी चक्क दुकाने भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. या भागात काही ठिकाणी "दुकान भाड्याने देणे आहे' असे फलक झळकत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गेल्या काही वर्षांत बाणेर, बालेवाडीचा विकास खूपच झपाट्याने झाला. त्यातच हिंजवडी आय.टी. पार्क या भागापासून जवळ असल्याने नोकरदारांनी देखील राहण्यासाठी या भागाची निवड केली. त्यामुळे येथे विविध व्यावसायिकांनी आपले व्यवसाय सुरू करत चांगलाच जम बसवला; परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमुळे या भागातील अनेक मोठमोठी कपडे, गाड्यांची शोरूम्स, हॉटेल, व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. या भागातील दुकान व शोरूमचे भाडे लाखांच्या घरात आहे.

'पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

कर्मचाऱ्यांचे पगार व इतर खर्च परवडत नसल्याने अनेक नामांकित शोरूम, दुकाने बंद झाली आहेत. दुकानांसमोर "जागा भाड्याने देणे आहे', अशा स्वरूपाचे फलक जागोजागी लावलेले दिसत आहेत. हीच परिस्थिती हॉटेल व्यावसायिकांची देखील आहे. पार्सल सुविधा जरी सुरू झाली असली तरी कोरोनामुळे नागरिकांचा पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याने हा व्यवसाय चालविणे कठीण झाले असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. 

StartupStory: सोशल डिस्टन्सिंगसाठी तरुणानं डोकं लढवलं; तुम्हीही कराल कौतुक

 

बाणेरमधील अनेक दुकाने बंद झाली आहेत. आमच्या जागेतील एक शोरूम खाली झाले आहे. नवीन भाडेकरू कधी मिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे हे आर्थिक नुकसान मोठे आहे. 
- अनिकेत मुरकुटे, जागा मालक, शिवशक्ती कॉम्प्लेक्‍स, बाणेर 
 

प्राथमिक ऊर्जावापरात भारत तिसऱ्या स्थानावर

माझे हॉटेल मार्चपासून बंद आहे. तेव्हा पासून सर्व कामगारांना पगार द्यावा लागला आहे. पार्सल सेवा सुरू केली असली तरी ग्राहकांकडून हवीतशी मागणी नाही. तसेच गाळ्यांची भाडी ही लाखाच्या घरात आहेत. या भागातील 50 टक्के हॉटेल बंद झाली आहेत. 
- अभय जाधव, हॉटेल चालक, हाय स्ट्रीट बालेवाडी  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The traders of Baner Road, Balewadi decided to rent the shop