अनलॉकच्या पहिल्याच दिवशी रस्ते लॉक; पुण्यात वाहतूक कोंडी

रस्त्यांची खोदाई आणि वाहने वाढल्याचा परिणाम
Pune Crowd
Pune CrowdSakal

पुणे : राज्य अनलॉक करण्याच्या दृष्टीने देण्यात आलेल्या सवलतींच्या पहिल्याच दिवशी शहरातील रस्ते वाहन कोंडीने लॉक झाले आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळात झालेली वाहतूक कोंडी, रस्ते खोदलेल्या ठिकाणी धूळ व खड्डे आणि त्यामुळे वैतागलेले वाहनचालक, असे चित्र सोमवारी सकाळपासूनच पाहायला मिळत आहे.

रस्त्यावर वाढलेल्या वाहनांची संख्या आणि सांडपाणी व जलवाहिनीसाठी सुरू असलेले खोदकाम यामुळे शहरात पुन्हा वाहतूक कोंडीने डोकेवर काढले आहे. लॉकडाऊन आणि कडक निर्बंधामुळे शहरातील रस्ते ब-याचदा मोकळे असायचे. मात्र पुन्हा गर्दी वाढून कोंडी निर्माण होत असल्याने अपेक्षित स्थळी जाण्याच्या वेळेत देखील वाढ झाली आहे.

Pune Crowd
पेठ भागात वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर! पावसामुळे वाडा कोसळला

कोरोना विषयक निर्बंध कडक केल्यानंतर महापालिकेने एकाच वेळी लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, शनिवार, नारायण आणि बुधवार पेठेतील इतर रस्त्यावर सांडपाणी वाहिनी व जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे तेथील अनेक ठिकाणी रस्ते खोदले आहेत. तसेच वाहिनी टाकल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

बाजीराव रस्त्यावर स्वारगेटपासून शनिवार वाडा, टिळक रस्त्यावर जेधे चौक ते अलका चौक यासह शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि एफसी रस्ता यासह त्यांना जोडणा-या अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे.

Pune Crowd
पुण्यात हॉटेलवर छापा; मद्यपान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

गर्दीमुळे खड्ड्यांतून वाट :

सांडपाणी वाहिनी व जलवाहिनी टाकल्यानंतर अनेक ठिकाणी रस्त्यांचे पुन्हा डांबरीकरण करण्यात आलेले नाही. केवळ माती टाकून वहिनी गाडण्यात आल्यानंतर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. कोंडी झाल्यानंतर दुचाकीस्वार त्यातून मार्ग काढत आहेत. या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रुग्णवाहिकेला होवू शकतो अडथळा :

कोरोनावर उपचार घेत असताना रुग्ण दुस-या रुग्णालयात दाखल करताना प्रत्येक मिनीट महत्त्वाचा असतो. अशा वेळी या वाहतूक कोंडीत जर एखादी रुग्णवाहिका अडकली तर ती वेळेत रुग्णालयात कशी जाणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

''घरापासून ऑफीसला जाण्यासाठी मला दररोज २० मिनिटं लागत. मात्र आज मला ४० मिनिटं प्रवास करावा लागला. रस्त्यात अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे. वाहतुकीचे नियमन देखील होताना दिसत नाही.''

- सुरेश पठारे, व्यावसायिक

Pune Crowd
संतापजनक! अज्ञातांकडून तोरणा किल्ल्यावरील बुरुजाची नासधूस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com