तो फक्त 'गाडी नीट चालवित जा' म्हणाला, बेशिस्त चालाकाला आला राग अन्

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

फिर्यादी हे रविवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास खराडीतील झेन्सॉर आयटी पार्कसमोरील एसबीआय इमारतीसमोरुन जात होते. त्यावेळी तिघेजण दुचाकीवरुन जात होते. फिर्यादी यांच्या हाताला त्यांच्या दुचाकीचा धक्का बसला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना गाडी नीट चालवित जा, असे सांगितले. त्याचा राग आल्याने त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली, त्यानंतर ते निघून गेले.

पुणे : गाडीचा धक्का लागल्यामुळे गाडी व्यवस्थित चालविण्याचा सांगितल्याच्या कारणावरुन टोळक्‍याने दोघांवर जीवघेणा हल्ला करून हॉटेलची तोडफोड केली. ही घटना रविवारी सायंकाळी साडे पाच वाजता खराडी येथील अनुसया पार्क गल्लीजवळ घडला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. 

प्लॅस्टिकच्या अंड्यांच्या अफवा सोशल मिडियावर व्हायरल; हे आहे सत्य
 

प्रतिक गजानन चव्हाण (वय 23), रोहित मिलींद खैरे (वय 20, दोघेही रा. गणपती हौसिंग सोसायटी, तुकाराम नगर, खराडी), अक्षय एकनाथ तावरे (वय 21, रा. गजानन कृपा बिल्डींग, साईनगर,चंदननगर), मनोज अभिमान कानडे (वय 20, रा.लक्ष्मीनिवास, भाजी मार्केट, चंदननगर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अर्पित राऊत (वय 31, रा.खराडी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Video : असे चित्र पाहून व्हाल थक्क; चित्रकाराचे वयं ऐकाल तर...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रविवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास खराडीतील झेन्सॉर आयटी पार्कसमोरील एसबीआय इमारतीसमोरुन जात होते. त्यावेळी तिघेजण दुचाकीवरुन जात होते. फिर्यादी यांच्या हाताला त्यांच्या दुचाकीचा धक्का बसला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना गाडी नीट चालवित जा, असे सांगितले. त्याचा राग आल्याने त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली, त्यानंतर ते निघून गेले.

तुम्हाला माहिती आहे कुठे मिळतो चायनीज मांजा? मग पोलिसांना सांगा कारण..

त्यानंतर फिर्यादी व त्यांचा मित्र अर्पित गजभिये असे दोघेजण एसबीआय इमारतीजवळील कॅफे केटीएस नावाच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते. तेव्हा काही वेळापुर्वी वाद झालेले दुचाकीवरील तिघेजण त्यांच्या साथीदारांना घेऊन फिर्यादींच्या येथे आले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला जबर मारहाण केली. तसेच ते चहा पित असलेल्या हॉटेलमधील खुर्च्या, टेबल व इतर वस्तु फिर्यादी यांच्या डोक्‍यात मारले. त्यामध्ये फिर्यादी यांच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाली. तसेच हॉटेलमधील सामानाचेही नुकसान झाले. 

पुणे : तेलाचा साठा असलेल्या गोडाऊनला भीषण आग; जीवितहानी नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two were beaten up by gangs due to suggesting to drive safely in pune