उद्योगनगरीतील बेरोजगार कामगार वळतायेत स्वस्त धान्य दुकांनाकडे

Unemployed workers are buying cheap grain in bhosari MIDC Pimpri
Unemployed workers are buying cheap grain in bhosari MIDC Pimpri

पिंपरी : भोसरी एमआयडीसी परिसरातील लहान-मोठ्या उद्योगांमधील कामगारांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळू लागली आहे. त्यातच, महागाईनेही कळस गाठला आहे. त्यामुळे, बेरोजगार झालेले कामगार परत स्वस्त धान्य दुकानदारांकडे वळाले असून त्यांच्याकडून पूर्वीप्रमाणे स्वस्त धान्याची मागणी होऊ लागली आहे. त्यांच्याकडील प्रतिज्ञापत्र आणि आधारकार्डावर त्यांना गहू, तांदूळ उपलब्ध करुन दिले जात आहे. 


तानाजी मालुसरेंच्या पुण्यतिथीला अजय देवगण सिंहगडावर येणार?

सध्याच्या मंदीसदृश्‍य वातावरणामुळे भोसरी एमआयडीसीमधील लहान-मोठ्या उद्योगांमधील कामगारांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ लागली आहे. त्यातच, महागाईही वाढली असल्यामुळे, पूर्वी, केशरी रंगाच्या शिधापत्रिका असतानाही स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य खरेदी न करणाऱ्या कामगार वर्गाला आता नाईलाजास्तव स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य खरेदी करावे लागत आहे. 

पीएमपी बससेवेचा मोठा निर्णय

अन्न व पुरवठा विभागाचे 'फ' परिमंडल अधिकारी नागनाथ भोसले म्हणाले,"सध्या उद्योग-कंपन्यांमधून कामगार कपात सुरु झाली आहे. त्यामुळे, आमच्याकडे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य मिळावे यासाठी लोकांची मागणी होऊ लागली आहे. त्यानुसार, आम्ही त्यांना प्रतिज्ञापत्र आणि आधारकार्डची छायांकित प्रत घेऊन त्यांना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ उपलब्ध करुन देत आहोत. दरमहा सुमारे 100 शिधापत्रिका धारकांकडून या प्रकारची मागणी येऊ लागली आहे. आवश्‍यक त्या ठिकाणी तहसिलदारांकडून उत्पन्नाचा दाखलाही घेतला जात आहे. ज्या शिधापत्रिकांची 2016 च्या आत नोंद झाली आहे. त्यांना प्राधान्याने धान्य पुरविले जात आहे.'' 


पर्यावरण कर भरा अन्‌ जुने वाहन चालवा!

केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी कमाल वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 59 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. त्यांना गहू आणि तांदूळ उपलब्ध करुन दिले जात आहे. शिधापत्रिकेवर साखर मिळणे यापूर्वीच बंद झाले असून केवळ अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांनाच साखर दिली जात आहे. 'फ' परिमंडलात पात्र 39 हजार 881 शिधापत्रिकाधारक असून त्यापैकी 35 हजार 355 लोकांनी मागील महिन्याभरात स्वस्त धान्य दुकानामधून धान्य खरेदी केले आहे. 

राज ठाकरेंनी 'यांना' दिली थेट पक्षात येण्याची ऑफर

"उद्योग-कारखान्यांत कामाला असताना पगार चालू होता. त्यामुळे, स्वस्त धान्य दुकानांमधून कामगारांची धान्यासाठी मागणी नव्हती. मात्र, आता कामावरुन ब्रेक मिळाल्याने किंवा नोकरी सुटल्याने बेरोजगार झालेले कामगार दुकानांवर स्वस्त धान्याची मागणी करत आहेत.''
- मोहनलाल चौधरी, स्वस्त धान्य दुकानदार, निगडी 

पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद 

डाळीचा अनियमित पुरवठा ! 
शिधापत्रिकेवर डाळींचा देखील पुरवठा केला जातो. मात्र, तो अनियमित आहे. तूरडाळ 55 रुपये तर हरभरा डाळ प्रतिकिलोला 45 रुपये भावाने उपलब्ध करुन दिली जाते. मागील महिन्यांत शिधापत्रिकाधारकांनी एकूण मिळून 5 हजार 164 क्विंटल गहू आणि 3 हजार 365 क्विंटल तांदूळ घेतले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com