

अमेरिकेची ४२ विमाने, ड्रोन नुकसानग्रस्त
वॉशिंग्टन, ता. २० (पीटीआय) : इराणविरुद्ध २८ फेब्रुवारीला सुरू करण्यात आलेल्या लष्करी संघर्षादरम्यान अमेरिकेची किमान ४२ लढाऊ विमाने, ड्रोन नष्ट किंवा नुकसानग्रस्त झाली आहेत. ‘काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिस’च्या (सीआरएस) अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. ही संख्या बदलू शकते, असेही सांगण्यात आले असून, युद्ध संघर्ष सुरू असल्याने याबाबतची अधिक माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे.
‘सीआरएस’ने ही आकडेवारी वृत्तसंस्था आणि अमेरिकेच्या संरक्षण विभाग; तसेच अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या निवेदनांवर आधारित करून तयार केली आहे. १२ मे रोजी ‘हाऊस अॅप्रोप्रिएशन्स सबकमिटी’च्या सुनावणीदरम्यान पेंटागॉनचे अधिकारी ज्युल्स डब्ल्यू. हर्स्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणमधील लष्करी कारवाईसाठी खर्चाचा अंदाज आता २९ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढला आहे. या खर्चापैकी मोठा भाग लष्करी उपकरणे आणि शस्त्रांच्या दुरुस्ती किंवा बदलासाठी खर्च केला जाणार आहे.
असे झाले नुकसान
४
एफ-१५ ई स्ट्राइक इगल विमाने
१
एफ-३५ ए लढाऊ विमान
१
ए-१० थंडरबोल्ट ग्राउंड-अटॅक विमान
६
केसी-१३५ स्ट्रॅटो टँकर हवाई इंधन भरणारी विमाने
१
ए-३ सेंट्री एडब्लू एसीएस विमान
२
एमसी १३० जे कमांडो
विशेष मोहिमांसाठीची विमाने
१
जॉली ग्रीन-हेलिकॉप्टर
२४
एम क्यू-९ रीपर ड्रोन
१
एम क्यू -४ सी ट्रायटन ड्रोन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.