Pune News : जारकरवाडीत रंगला कुस्त्यांचा आखाडा

जिंकणाऱ्या समाधान दगडे ला मिळाली चांदीची गदा
Vadjadevi Yatra samadhan kate won wrestling silver gada sport pune
Vadjadevi Yatra samadhan kate won wrestling silver gada sport pune sakal

पारगाव : जारकरवाडी ता. आंबेगाव येथील श्री. वडजादेवी यात्रे निमित्त आयोजित कुस्त्यांच्या आखाड्यात मल्लांच्या शड्डुचा आवाज घुमला संपुर्ण पुणे जिल्ह्यातुन आलेल्या मल्लांनी चीतपट कुस्त्या करून कुस्ती शौकिनांची मने जिंकली विजेत्या पहीलवांना ग्रामस्थ व वैयक्तिक असे एकुण ७५ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली.

Vadjadevi Yatra samadhan kate won wrestling silver gada sport pune
WPL 2023 : धारावीच्या गल्लीत खेळणारी सिमरन थेट जागतिक क्रिकेटपटूंना भिडणार

शेवटची मानाची वडजादेवी केसरी किताब कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन अक्षय माने विरुध्द महाराष्ट्र चॅम्पियन समाधान दगडे यांच्यात झाली कुस्ती जिंकलेल्या समाधान दगडे ला दत्तात्रय भोजणे, संतोष वाव्हळ, वाल्मिक कुटे, राजु बालवडकर, काळूराम कवितके व ओम साई ग्रुप यांच्या वतीने चांदीची गदा बक्षीस देण्यात आली.

Vadjadevi Yatra samadhan kate won wrestling silver gada sport pune
IND vs AUS: इंदूर खेळपट्टीची बाजू घेण्यासाठी गावसकर उतरले बॅट घेऊन, आयसीसीला दिले फटकार

येथील श्री. वडजादेवी मंदिरात यात्रेच्या दुसऱ्या दिवशीही सकाळपासुन भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कुस्त्यांच्या आखाड्यात संपुर्ण पुणे जिल्ह्यातील देहु, शिक्रापुर, मुळशी, मावळ, शिरुर व पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील तालमीमधील मल्लांनी चमकदार खेळी करुन चितपट कुस्त्या केल्या, निकाली कुस्ती करणाऱ्या पहिलवानास ५१ रुपयांपासुन सात हजार ७७७ रुपयांपर्यंत बक्षिसे देण्यात आली वैयक्तिक व ग्रामस्थांच्या वतीने एकुण सुमारे ७५ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली.

Vadjadevi Yatra samadhan kate won wrestling silver gada sport pune
Doping Test : डोपिंगप्रकरणी धावपटू निकितावर तीन वर्षांची बंदी

पंच म्हणून पहिलवान जयवंत कवितके, पहिलवान नंदु ढोबळे,हारकु वाव्हळ व के. डी. भोजणे यांनी काम पहिले स्वागत भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, प्रथम लोकनियुक्त सरपंच रुपाली भोजणे यांनी केले आखाड्याची व्यवस्था यात्रा समीतीचे अध्यक्ष रविंद्र काकडे, शिवाजी भोजणे, शरद भोजणे, अशोक देवडे,बाळासाहेब ढोबळे व यात्रा उत्सव समितीने पाहीली. आखाड्याचे सूत्र संचालन दत्तात्रय भोजणे व नवनाथ जारकड यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com