विघ्नहर साखर कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ

दत्ता म्हसकर
Wednesday, 14 October 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा ३५ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ आज बुधवारी ता. १४ रोजी अत्यंत साध्या पध्दतीने करण्यात आला.

जुन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा ३५ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ आज बुधवारी ता. १४ रोजी अत्यंत साध्या पध्दतीने करण्यात आला. चेअरमन सत्यशील शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप व संचालक मंडळाच्या उपस्थितीत गव्हाणीची विधीवत पुजा करुन नंतर उसाची मोळी टाकण्यात आली. यावेळी आजी माजी संचालक व अधिकारी उपस्थित होते.

पुण्यात कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याच्या शक्‍यतेने महापालिकेने असे केले नियोजन

यावेळी चेअरमन शेरकर म्हणाले, यंदा कोरोनामुळे इच्छा असूनही सर्वांना बोलावता आले नाही. ऑफ सिझनमध्ये कोरोनामुळे आलेल्या अनेक अडचणींवर मात करुन कारखाना गाळपासाठी सज्ज केला आहे. अनेक कामगार कोरोना बाधीत झाले मात्र त्या सर्वांनी या आजारावर मात केली आहे. ऊस तोडणी कामगारांच्या संपामुळे मजूर आणण्यात अडचणी येत आहेत. ऊस तोडणी दरात जी वाढ होईल ती देऊ असे आश्वासन देवून मजूर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी असणार आहे.त्यांच्या आरोग्याची तपासणी वेळोवेळी करणार आहोत.ग्रामस्थांनी ऊस तोडणी कामगारांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

Video : ‘जंबो’नं दिलं नवं आयुष्य; रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता

केंद्र शासनाने शेतकर्‍यांच्या ऊसासाठी एफआरपीमध्ये शंभर रुपयांची वाढ केली, परंतू दुसर्‍या बाजूला साखरेच्या किमान विक्री किंमतीमध्ये मात्र कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही. सध्या असलेली साखरेची किमान विक्री किंमत वाढवून मिळाल्यास उत्पन्न व खर्च याचा मेळ बसविण्यास मदत होईल. मागील दोन वर्षांचे साखर निर्यातीसाठी जाहिर केलेले अनुदान अद्याप कारखान्यांना दिलेले नाही. आपल्या कारखान्याचे सुमारे ४९ कोटी साखर निर्यात अनुदान थकीत आहे ते लवकर मिळावे अशी मागणी त्यांनी केली.

‘अहो, मास्क घाला, गळ्यात कशाला अडकवलाय? पीएमपी कंडक्टरांची वाढली डोकेदुखी

व्हाईस चेअरमन अशोक घोलप यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले यांनी सुत्र संचलन केले.
या गाळप हंगामासाठी विघ्नहरच्या कार्यक्षेत्रामध्ये सभासद व बिगर सभासदांच्या २४ हजार ३५० एकर ऊसाच्या तोडणीचे नियोजन केले आहे. ट्रक,ट्रॅक्टर ट्रॉली, बैलगाडी यासह सहा ऊस तोडणी यंत्रांचे करार केले आहेत नवीन ५ ऊस तोडणी यंत्रे शेतकर्‍यांमार्फत घेण्यात येणार आहेत. नोंद झालेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यात येईल. सभासद, ऊस उत्पादकांनी सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी केले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vighnahar's 35th season begins