व्हर्च्युअली अनुभवा नौदलाचा थरार! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा ‘भारतीय नौदल दिवस’ व्हर्च्युअली साजरा करण्यात येणार आहे. दलाच्या विविध थरारक सागर मोहिमांसह त्यामध्ये शौर्य गाजविलेल्या जवानांच्या मुलाखती घरबसल्या पाहता येणार आहेत.

पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा ‘भारतीय नौदल दिवस’ व्हर्च्युअली साजरा करण्यात येणार आहे. दलाच्या विविध थरारक सागर मोहिमांसह त्यामध्ये शौर्य गाजविलेल्या जवानांच्या मुलाखती घरबसल्या पाहता येणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१९७१ च्या युद्धात पाकिस्तानवर भारतीय नौदलाच्या मिळविलेल्या विजयाच्या प्रीत्यर्थ दरवर्षी ४ डिसेंबर हा ‘नौदल दिवस’ (नेव्ही डे) म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी भारतीय नौदलाच्या वतीने नागरिकांत जनजागृती करण्यासाठी, राष्ट्रप्रेम जागविण्यासाठी, आपली प्रतिमा उंचविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या दिनाची थीम ‘इंडियन नेव्ही-कॉम्बॅट रेडी, क्रेडीबल एंड कोचसिव्ह’ ही आहे.

पदवीधरमध्ये तिप्पटीने, तर शिक्षकांमध्ये दुप्पटीने मतदानाचा टक्का वाढला 

आयएनएस विक्रमादित्यची टूर
आयएनएस विक्रमादित्यच्या वरच्या डेकचा एक छोटा व्हर्च्युअल रियालिटी (व्हीआर) टूर व्हिडिओ हा भारतीय नौदलातील विमानवाहू सेवेचा असेल, जो दर्शकांना पाहण्यासाठी तयार आहे. दर्शक आपला स्मार्ट फोन वापरून फ्लाइट डेक आणि अन्य अवर्गीकृत क्षेत्र ३६० अंशातून व्हिडिओद्वारे पाहू शकतात.

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना बदल करण्यासाठी मुदत

आयएनएस म्हैसूर ‘अ वॉक अराऊंड’ 
नौदलातील विनाशक ‘आयएनएस म्हैसूर’ही दर्शकांसाठी व्हर्च्युअली उपलब्ध आहे. दर्शकांना जहाजातील कर्मचाऱ्यांकडून संबंधित ब्रीफिंगसह जहाजाच्या प्रमुख ठिकाणांच्या आभासी प्रवासाची अनुभूती देणारा ‘अ वॉक अराऊंड’ हा कार्यक्रम होईल.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंचरसाठी नगरपंचायतीची मागणी

शौर्य पुरस्कार पुरस्कारार्थीच्या मुलाखती 
शौर्य पुरस्कार विजेते आणि भारतीय नौदलाच्या इतर तज्ज्ञांच्या रेडिओ मुलाखती एफएम चॅनेलद्वारे प्रसारित केल्या जात आहेत. ४ डिसेंबर रोजी रेडिओ मिर्चीवर आणि ‘एआयआर एफएम’वर १ ते ४ डिसेंबर दरम्यान प्रसारण होईल.

पुण्यात बहाद्दरांनी पळविली दारुच्या बाटल्यांची तब्बल 32 खोकी

भारतीय नौदलाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण www.indiannavy.nic.in/content/wnc-navy-week-2020 या संकेतस्थळावर होईल. तसेच नौदलाच्या फेसबुक, यु ट्यूब आणि इन्स्टाग्राम पेजवरही संबंधित कार्यक्रम पाहता येतील.

बीटिंग रिट्रीट सोहळ्यासह नेव्ही डे स्पेशल फिल्म 
नौदल दिनावर आधारित असलेल्या इंग्रजी फिल्म ३ डिसेंबर रोजी दूरदर्शनवर प्रसारित होईल. प्रादेशिक वाहिनीवरही याचे प्रसारण केले जाणार आहे. यात फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड यांचा संदेश असेल. प्रादेशिक भाषांमध्ये नेव्हल ऑपरेशन्सचा थरार माहितीपटातून उलगडला जाणार आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virtually experience the thrill of the navy