विठ्ठलवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी वैभव गवारे

विठ्ठलवाडी सोसायटीच्या
अध्यक्षपदी वैभव गवारे
Published on

तळेगाव ढमढेरे, ता. १९ : विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी वैभव गवारे, तर उपाध्यक्षपदी ॲड. संतोष गवारे यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या अध्यक्षा मनीषा गवारे आणि उपाध्यक्ष सतीश गवारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी वैभव गवारे आणि उपाध्यक्षपदासाठी ॲड. संतोष गवारे यांचे एकमेव अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत पिसाळ व सचिव सुदेश शीलवंत यांनी कामकाज पाहिले. यावेळी संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष वैभव गवारे व उपाध्यक्ष ॲड. संतोष गवारे यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

09116, 09117

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com