खेडसह शिरूरसाठी आनंदाची बातमी! चास कमान धरणातील पाणीसाठा नव्वदी पार

राजेंद्र लोथे
Monday, 24 August 2020

चास-कमान धरणाच्या अंतर्गत असलेले कळमोडी धरण 11 ऑगस्टला शंभर टक्के भरलेले असल्याने या धरणातून होणाऱ्या विसर्गातून येणारे पाणी चास-कमान धरणात येत असल्याने चास-कमान धरणाच्या पाण्यात मोठी वाढ होण्यास मदत झाली. चास कमान धरणात सद्य स्थितीत एकुण पाणीसाठा 7.87 टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा 6.91 टीएमसी झाला असून धरणाची टक्केवारी 91.19 टक्के झाली आहे.

चास(पुणे) : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील भीमाशंकर खोऱ्यासह चास-कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेली काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून या पावसामुळे चास-कमान धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होवून पाणीसाठ्याने नव्वदी पार केली आहे. चास-कमान धरण लवकरच शंभर टक्के भरणार असल्याने खेड तालुक्यासह शिरूर तालुक्यासाठी आनंदाची बातमी असल्याची माहिती सहाय्यक अभियंता प्रेमचंद शिंदे तसेच शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 
खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याच्या जनतेचे लक्ष ज्या चास-कमान धरणाच्या पाणीसाठ्याकडे लागले होते त्या चास-कमान धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होवून धरणाने नव्वदी पार केली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेली काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून त्याचा फायदा जलाशयातील पाणीसाठा वाढण्यास झाला आहे. जुन, जुलै व ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला जेमजेम झालेल्या पावसामुळे चालू वर्षी धरण भरणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती, मात्र, अखेर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर वरूण राजाने दमदार हजेरी लावल्याने धरण लवकरच शंभर टक्के भरणार आहे.

वरसगाव ओव्हरफ्लो; खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवला

चास-कमान धरणाच्या अंतर्गत असलेले कळमोडी धरण 11 ऑगस्टला शंभर टक्के भरलेले असल्याने या धरणातून होणाऱ्या विसर्गातून येणारे पाणी चास-कमान धरणात येत असल्याने चास-कमान धरणाच्या पाण्यात मोठी वाढ होण्यास मदत झाली. चास कमान धरणात सद्य स्थितीत एकुण पाणीसाठा 7.87 टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा 6.91 टीएमसी झाला असून धरणाची टक्केवारी 91.19 टक्के झाली आहे.

केंद्र सरकारच्या धोरणावर अजित पवारांचा सावध पवित्रा; सरसकट वाहतुकीबाबत वेगळा निर्णय घेणार?​

धरणात येणारी पाण्याची आवक 3000 दलघमी असून धरण परिसरात एक जुनपासून 564 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. धरणाच्या वाढत्या पाणीसाठ्यावर धरण कर्मचारी भिवसेन गुंडाळ, बाबाजी कडलग, बाळासाहेब आनंदकर, ज्ञानेश्र्वर हुले, ज्ञानेश्र्वर कदम,  सुधाकर तनपुरे, शांताराम नाईकडे, दत्ता नवले, विठ्ठल नाईकडे, सुरेश गुंडाळ व रोहिदास तनपुरे लक्ष ठेवून आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water reserves in Chas Kaman Dam exceed 90 percent