वरवंड-पाटस यात्रा उत्सव रद्द; औपचारिक पद्धतीने होणार धार्मिक कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 November 2020

थेट गाभाऱ्यातील दर्शनावर मज्जाव करण्यात आला आहे. महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र रांगेचे नियोजन करण्यात आले आहे.

वरवंड (पुणे) : कोरोनाचा वाढता फैलाव पाहता दौंड तालुक्यातील वरवंड येथील श्री गोपीनाथ महाराज मंदिर आणि पाटस येथील श्री नागेश्वर मंदिराचा ऱविवार (ता.२९) पासून सुरू होणारा दोन दिवसीय यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. मात्र, मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यापासून विशिष्ट अंतरावरून सर्व नियम पाळून देव दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. किंबहुना स्क्रीनद्वारेही दर्शनाची सुविधा उपलब्धता होणार आहे, अशी माहिती यात्रा उत्सव कमिटीच्यावतीने देण्यात आली.

काय सांगता! पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात CCTVच नाही​

जिल्ह्यात नावजलेल्या यात्रा उत्सवांपैकी वरवंड येथील श्री गोपीनाथ महाराज मंदिर आणि पाटस येथील श्री नागेश्वर मंदिराचा यात्रा उत्सव या एक आहेत. दरवर्षी दोन्ही यात्रेत कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. यंदा रविवारपासून उत्सव होत आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे यात्रा उत्सवाला घरघर लागली आहे. दोन्ही गावात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गावच्या यात्रा कमिटीने यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत​

मात्र, केवळ धार्मिक कार्यक्रम औपचारीक पध्दतीने करण्यात येणार आहेत. उत्सवानिमित्त मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. वरवंड येथील यात्रेच्या मुख्य दिवशी रविवारी रात्री केवळ एकच मुख्य अभिषेक घालण्यात येणार आहे. इतर कोणतेच अभिषेक होणार नाही. सायंकाळी ठराविक लोकांच्या उपस्थितीत छबिना आणि मानाच्या पाटलाचे लोटांगण होणार आहे. थेट गाभाऱ्यातील दर्शनावर मज्जाव करण्यात आला आहे. महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र रांगेचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी दोन व्यक्तींना विशिष्ट अंतर ठेवूनच दर्शनासाठी उभे राहावे लागणार आहे. यावेळी मास्क आणि सॅनिटाइझरचा वापर करावा.

Sakal Impact: पोलिस प्रशासन जागं झालं; लग्न समारंभाबाबत अधीक्षकांनी काढले आदेश​

विनामास्क दिसणाऱ्या भाविकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस पाटील किशोर दिवेकर यांनी सांगितले. पाटस येथील श्री नागेश्वर मंदिरावर विद्युत रोषणाई केली आहे. कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि कुस्त्यांचा आखाडा आदी कार्यक्रमांना फाटा देण्यात आला आहे. काही अटी-शर्तींवर मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे. मंदिरात सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून रांगेचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जयंत शितोळे पाटील यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yatras at Varvand and Patas in Daund taluka canceled due to corona pandemic

Tags
टॉपिकस
Topic Tags: