हडपसर : ड्रेनेजची पाणी गळती बेतली 'त्याच्या' जिवावर

sachin gaikwad.jpg
sachin gaikwad.jpg

हडपसर (पुणे) : रामटेकडी येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या (एसआरए) योजनेतून बांधण्यात आलेल्या प्रथमा इमारतीमध्ये पाय घसरून झालेल्या अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला.

सचिन तुकाराम गायकवाड ( वय ३०, रा. रामटेकडी, हडपसर) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे. सचिन हा दूध आणण्यासाठी दुकानात चालला होता. यावेळी पार्कींगमध्ये पाणी गळती होत असल्याने त्याचा पाय घसरून तो डोक्यावर पडला. त्यानंतर नागरिकांनी तातडीने त्याला खासगी रूग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, डॅाक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. 

प्रथमा इमारतीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून ड्रेनेजचे पाणी गळत आहे. तसेच जागोजागी कचरा साठला आहे. याबाबत सोसायटींच्या संचालकांकडे सभासदांनी अनेकदा तक्रारी करून देखील कोणतीच कार्यवाही झाली नाही. संचालकांच्या दुर्लक्षामुळेच सचिनचा मृत्यू झाला अशी नागरिकांमध्ये चर्चा होती. 

सचिन हा मनमिळावू होता. त्याला व्यायामाची आवड होती. विविध सामाजिक उपक्रमामध्ये तो सहभागी होत होता. लोकांना सहकार्य करण्याबाबत तो नेहमीच पुढे असायचा. तो एका दुचाकीच्या शोरूममध्ये कामाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, १ मुलगी व एक बहिण आहे. सर्व कुटूंब सचिनवर अवलंबून होत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com