राज्यात वणव्यांच्या घटनेत गेल्या वर्षांत दुप्पट वाढ

देशात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
fire
firesakal

पुणे : देशात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लागलेल्या वणव्यांच्या आकडेवारीत महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यांत आहे. तर यंदाही देशातील दहा सर्वाधिक वणव्यांच्या(fire) घटना घडलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. राज्यात वणव्यांच्या घटनेत गेल्या वर्षांत दुप्पट वाढ झाली असून २०२०-२१ दरम्यान ३४ हजाराहून अधिक वणवे लागल्याची बाब नुकतीच समोर आली आहे.

fire
पुणे : शहरावर पहाटेच्या धुक्याची झालर; पहा फोटो

फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया (एफएसआय) मार्फत नुकताच 'इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट २०२१' हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. त्यामध्ये नोव्हेंबर २०१९ ते जून २०२० आणि नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ या कालावधीत विविध राज्यांमध्ये झालेल्या वणव्यांच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. यासाठी मॉडरेट रिझोल्यूशन इमेजिंग स्पेक्ट्रो-रेडिओमीटर (एमओडीआयएस) आणि एसएनपीपी- व्हीआयआयआरएस या सेन्सर्सचा वापर करण्यात आला आहे.राज्यात २०१९ ते २० या कालावधीत १४ हजाराहून अधिक वणव्यांच्या घटना घडल्या. तर २०२० ते २१ दरम्यान सुमारे ३४ हजार वणव्यांची नोंद करण्यात आली. परिणामी वाढत्या वणव्यांमुळे जंगलांची होरपळ सुरू आहे. वनवणव्यांमुळे बहुमोल वनसंपत्ती नष्ट होत असून जैवविविधतेचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे.

fire
घरेलू कामगार नोंदणी नूतनीकरणाकडे पाठ

अहवालातील महत्त्वाच्या बाबी :

- देशातील वनच्छादित भागातील १०.६६ टक्के क्षेत्र हे अत्यंत आग प्रवण क्षेत्राखाली

- त्यात पश्चिम महाराष्ट्रातील काही भागाचा समावेश

- राज्यात नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ दरम्यान ३४ हजार २५ वणव्यांच्या घटना

- यामध्ये सर्वाधिक १० हजार ५७७ घटना गडचिरोली येथे नोंदविण्यात आल्या

- महाराष्ट्रातील जंगलांमधील अनेक वणवे मनुष्यनिर्मित

देशातील पाच जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ दरम्यान सर्वाधिक वणव्यांची घटना :

जिल्हा : वणव्यांची घटना

  1. गडचिरोली : १०५७७

  2. कंधमाळ : ६१५६

  3. बिजापूर : ५४९९

  4. कारबी अँगलाँग : ४८८१

  5. कडप्पा : ४८७२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com