काँग्रेसचा पराभव फक्त काँग्रेसच करु शकतं, इतर कुणीही नाही - सिद्धू

पक्षातील अंतर्गत गटबाजीवरून सिद्धूंनी हे वक्तव्य केलं आहे.
Navjot Singh Sidhu
Navjot Singh Sidhusakal

पंजाब काँग्रेसचे (Congress) प्रदेश अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीवर भाष्य केलं. काँग्रेस (Congress) पक्षाला कोणीही पराभूत करू शकत नाही, फक्त काँग्रेसच काँग्रेसला पराभूत करू शकतो असं सिद्धू म्हणाले आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections 2022) रणधुमाळीला सुरूवात झाली असून, यामध्ये पंजाब हे एक महत्वाचं राज्य आहे. पंजाबमध्ये काँग्रेसलं यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाला नुकसान होऊ शकतं असं चित्र निर्माण झालं आहे.

Navjot Singh Sidhu
बापूंच्या पुण्यतिथीला कालीचरणला ‘गोडसे आपटे भारतरत्न’ पुरस्कार
Navjot Singh Sidhu
पेगासिस प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; सरकारच्या अडचणी वाढणार!

मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी आणि सिद्धू यांनी राहुल गांधींना राज्याच्या दौऱ्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची विनंती केली होती. त्यानंतर राहुल गांधींनी यासंदर्भातील निर्णय पक्षाचे कार्यकर्ते घेतील असं सांगितलं होतं. सिद्धूंनी यावेळी शिरोमणी अकाली दलावर सुद्धा टीका केली आहे. बिक्रम सिंग मजिठिया यांना शिरोमणी अकाली दलाने सिद्धूंच्या मतदारसंघातून रिंगणात उतरवलं आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, "बिक्रम सिंह मजिठिया हे पर्चा माफिया आहे."

Navjot Singh Sidhu
अधिकाऱ्यानं केलं माजी खासदाराचं कौतुक; केंद्रीय मंत्री भडकले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com