
ॲड. रोहित एरंडे, rohiterande@hotmail.com
सध्याच्या ऑनलाइन जमान्यात सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून आर्थिक फसवणूक केली जाते. ‘सोयी तितक्या गैरसोयी’ असे म्हणतात, त्याप्रमाणे ‘वन क्लिक अवे’च्या जमान्यात अशा घटना घडल्यावर सर्वसामान्य माणूस अगदी हतबल होऊन जातो; कारण काही कळायच्या आत पैसे गेलेले असतात. नागरिकांच्या रक्षणासाठी रिझर्व्ह बँक, उच्च न्यायालय; तसेच सर्वोच्च न्यायालयाने पावले उचलली असून, लोकांना दिलासा दिला आहे. अशा ऑनलाइन फसवणूक प्रकरणातील न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निकालांमुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.