1991 Reforms: देश आर्थिक संकटात असताना नरसिंह रावांच्या काळात बेस्ट टीम कशी बनली? RBIचे माजी गव्हर्नर यांनी सांगितला किस्सा

Ex-RBI Governor C Rangarajan: आरबीआयचे माजी गव्हर्नर सी रंगराजन यांनी एका मुलाखतीत, 1992 मध्ये सरकारमधील सर्वात चांगली टीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेकांचा तपशील शेअर केला आहे.
Ex-RBI Governor C Rangarajan on how the best financial team came about in Manmohan-Rao regime
Ex-RBI Governor C Rangarajan on how the best financial team came about in Manmohan-Rao regime Sakal

Ex-RBI Governor C Rangarajan: आरबीआयचे माजी गव्हर्नर सी रंगराजन यांनी एका मुलाखतीत, 1992 मध्ये सरकारमधील सर्वात चांगली टीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेकांचा तपशील शेअर केला आहे. हा तो काळ होता जेव्हा भारताने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वसमावेशक आर्थिक सुधारणा केल्या होत्या.

त्या वेळी रंगराजन आणि अर्थतज्ज्ञ माँटेक सिंग अहलुवालिया आणि मनमोहन सिंग हे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे भाग होते. राव पंतप्रधान असताना मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले. 1991 मध्ये ऐतिहासिक आणि अत्यंत आवश्यक असलेल्या आर्थिक सुधारणांचे श्रेय या दोघांना दिले जाते.

Ex-RBI Governor C Rangarajan on how the best financial team came about in Manmohan-Rao regime
Sugar Mills: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकारने 21 साखर कारखान्यांना दिली कर्जाची हमी, महायुतीच्या नेत्यांना फायदा?

रंगराजन म्हणाले की त्या वेळी असे ठरले होते की, सरकार बाहेरून चांगल्या लोकांची नियुक्ती करेल. सरकार नोकरशहा, विशेषत: नागरी सेवक, आयएएस अधिकारी चालवत होते. पण पंतप्रधानांनी ठरवले की बाहेरून लोक आणणे आणि त्यांना व्यवस्थेचा भाग बनवणे चांगले आहे.

"मी रिझर्व्ह  बँकेत येण्यापूर्वी जवळपास 20 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात घालवली होती. त्याचप्रमाणे माँटेक सिंग अहलुवालिया, शंकर आचार्य आणि इतर लोक देखील होते, जे कार्यक्षम आणि सक्षम होते''

रंगराजन यांनी डिसेंबर 1992 ते नोव्हेंबर 1997 पर्यंत RBI गव्हर्नर म्हणून काम केले. त्यांनी एक वर्ष (2003-4) बाराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि त्यानंतर ऑगस्ट 2009 ते मे 2014 पर्यंत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले.

Ex-RBI Governor C Rangarajan on how the best financial team came about in Manmohan-Rao regime
Credit Card: भारतीयांमध्ये क्रेडिट कार्डची क्रेझ वाढली; खर्चात 27 टक्क्यांनी वाढ, 'या' बँकेतून झाले सर्वाधिक व्यवहार

अहलुवालिया जागतिक बँकेतून सरकारमध्ये सामील झाले होते, तेथे ते उत्पन्न वितरण विभागाचे प्रमुख होते. त्याचप्रमाणे, शंकर आचार्य, जे 1993 मध्ये सरकारमध्ये सामील झाले, त्यांनी 1971 ते 1982 या काळात जागतिक बँकेत एक दशकाहून अधिक काळ काम केले. आचार्य यांनी एप्रिल 1993 ते मार्च 2001 या कालावधीत सीईए (सचिव पद) म्हणून काम केले.

"म्हणून, त्या वेळी असे घडले की, बाहेरून ज्ञान घेतलेले आणि सिस्टीममध्ये येणारे लोक खरोखर योगदान देऊ शकतील अशा लोकांचे मिश्रण होते.,” रंगराजन म्हणाले.

केंद्राने जुलै 2019 मध्ये तत्त्वतः, काही मंत्रालये आणि विभागांमध्ये संयुक्त सचिवांच्या 10 पदांवर आणि उपसचिव/संचालक स्तरावरील 40 पदांवर बाहेरील तज्ञांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com