IndiGo: इंडिगोचे सह-संस्थापक राकेश गंगवाल विकणार कंपनीतील हिस्सा; 6600 कोटी रुपयांची होणार डील

IndiGo Rakesh Gangwal: एअरलाइन इंडिगोचे सह-संस्थापक राकेश गंगवाल, इंटरग्लोबल एव्हिएशन या मूळ कंपनीतील आपला हिस्सा विकण्याच्या तयारीत आहेत. राकेश गंगवाल आता जवळपास 6 टक्के हिस्सा विकू शकतात.
IndiGo co-founder Rakesh Gangwal likely to sell higher stake of 5-8 percent looks to raise Rs 6,600 crore
IndiGo co-founder Rakesh Gangwal likely to sell higher stake of 5-8 percent looks to raise Rs 6,600 crore Sakal

IndiGo Rakesh Gangwal (Marathi News): एअरलाइन इंडिगोचे सह-संस्थापक राकेश गंगवाल, इंटरग्लोबल एव्हिएशन या मूळ कंपनीतील आपला हिस्सा विकण्याच्या तयारीत आहेत. राकेश गंगवाल आता जवळपास 6 टक्के हिस्सा विकू शकतात. गंगवाल यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये इंटरग्लोब एव्हिएशन बोर्डाच्या त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता आणि एअरलाइनमधील त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची भागीदारी हळूहळू कमी करण्याची योजना देखील जाहीर केली होती.

माहितीनुसार, गंगवाल आता त्यांचा 5.8 टक्के हिस्सा विकू शकतात. यापूर्वी 3.3 टक्के शेअर विकण्याची योजना होती. CNBC TV 18 कडून मिळालेल्या माहितीनुसार, ही डील 6600 कोटी रुपयांची असू शकते आणि त्याची फ्लोअर प्राइस 2925 रुपये प्रति शेअर शक्य आहे.

हा स्टॉक सध्या 3100 च्या पातळीवर आहे. 7 मार्च रोजीच, मनीकंट्रोलच्या अहवालात असे म्हटले होते की गंगवाल 3.3% हिस्सा विकू शकतात. सध्या गंगवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांची एअरलाइनमध्ये 25 टक्के हिस्सेदारी आहे.

आत्तापर्यंत सह-संस्थापकांनी अनेक टप्प्यांत त्यांचे स्टेक विकले आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये, गंगवाल कुटुंबाने 4 टक्के भागभांडवल 2900 कोटी रुपयांना विकले होते. त्यानंतर सप्टेंबर 2022 आणि ऑगस्ट 2023 मध्येही स्टेक विकला होता.

IndiGo co-founder Rakesh Gangwal likely to sell higher stake of 5-8 percent looks to raise Rs 6,600 crore
Veg Thali Price: शाकाहारी थाळी झाली महाग; तर मांसाहारी थाळी झाली स्वस्त, काय आहे कारण?

एका वर्षात स्टॉक 67 टक्क्यांनी वाढला

गेल्या एका वर्षात इंडिगोचा शेअर गुंतवणूकदारांसाठी चांगला परतावा देणारा स्टॉक ठरला आहे. एका वर्षात स्टॉक 67 टक्क्यांनी वाढला आहे. तर 3 वर्षांचा परतावा 78 टक्क्यांपेक्षा थोडा जास्त आहे. 3 महिन्यांत स्टॉक 8 टक्क्यांनी वाढला आहे.

कोण आहे राकेश गंगवाल?

राकेश गंगवाल हे भारतीय-अमेरिकन अब्जाधीश आहेत. गंगवाल यांनी 1984 मध्ये युनायटेड एअरलाइन्समधून त्यांच्या एअरलाइन कारकीर्दीची सुरुवात केली आणि यूएस एअरवेज ग्रुपचे मुख्य कार्यकारी आणि अध्यक्ष म्हणून काम केले. फोर्ब्सच्या मते, त्यांची एकूण संपत्ती सध्या 37,100 कोटी रुपये आहे आणि एवढ्या संपत्तीसह ते सध्या जगातील 621 व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

IndiGo co-founder Rakesh Gangwal likely to sell higher stake of 5-8 percent looks to raise Rs 6,600 crore
Valuable Company: Nvidia जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनण्याच्या मार्गावर; लवकरच Appleला टाकणार मागे

2022 मध्ये बोर्डाचा राजीनामा दिला होता

राकेश गंगवाल यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये इंडिगोच्या बोर्डाचा राजीनामा दिला होता आणि ते म्हणाले होते की ते पाच वर्षांत एअरलाइनमधील आपली हिस्सेदारी कमी करणार. ET च्या अहवालानुसार शोभा गंगवाल यांनी फेब्रुवारीमध्ये कंपनीतील हिस्सेदारी 4% पेक्षा जास्त कमी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com