Microsoft crosses 3 trillion dollar market cap mark for 1st time in its history
Microsoft crosses 3 trillion dollar market cap mark for 1st time in its history Sakal

Microsoft Market Cap: मायक्रोसॉफ्टने केला नवा विक्रम; कंपनीचे मार्केट कॅप 3 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे

Microsoft Market Cap: मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीची एकूण मालमत्ता अॅपलपेक्षा जास्त झाली होती. ज्यामुळे ती जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली होती. शेअर्सच्या वाढीनंतर कंपनीचे मार्केट कॅप 3 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहे.

AI मुळे कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये 1.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता प्रति शेअर किंमत 403.95 डॉलर आहे. कंपनीचे बाजार भांडवल 3 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

मायक्रोसॉफ्टचे बाजार भांडवल 24 जानेवारी रोजी 3 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. आयफोन उत्पादक अॅपलने गेल्या वर्षी जूनमध्ये हा टप्पा गाठला होता. काही काळासाठी, मायक्रोसॉफ्टचे बाजार मूल्य Apple पेक्षा जास्त झाले होते. मात्र, नंतर त्यात घसरण झाली. तेव्हापासून पहिल्या क्रमांकासाठी संघर्ष सुरूच आहे.

Microsoft crosses 3 trillion dollar market cap mark for 1st time in its history
Budget 2024: अर्थमंत्री ग्रामीण भागासाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता; एफएमसीजी क्षेत्राला आशा

AIमुळे मायक्रोसॉफ्टची मोठी झेप

कंपनीची ChatGPT सोबत मोठी भागीदारी आहे, ज्याचे मूल्य 13 अब्ज डॉलर आहे. ChatGPT लाँच झाल्यापासून, मायक्रोसॉफ्टने अनेक उत्पादने लाँच केली आहेत. नोव्हेंबर 2022 च्या सुरुवातीला ChatGPT लाँच झाल्यापासून, मायक्रोसॉफ्टचे शेअर्स जवळपास 67 टक्क्यांनी वाढले आहेत, तर Apple चे शेअर्स जवळपास 40 टक्क्यांनी वाढले आहेत.

क्लाउड कॉम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये AI च्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग इंटेलिजन्सच्या अहवालानुसार, 2024 च्या आर्थिक वर्षात कंपनीच्या उत्पन्नातील सुमारे 15 टक्के वाढ AI मधून होणार आहे.

Microsoft crosses 3 trillion dollar market cap mark for 1st time in its history
Budget 2024: केंद्र सरकार अन्न अनुदानासाठी 2.2 ट्रिलियन तरतूद करण्याची शक्यता; कोणाला होणार फायदा?

या वाढीमुळे वॉल स्ट्रीटवर मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जवळपास 90 टक्के तज्ञ हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. सध्या त्यात सात टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असा त्यांचा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com