Uday Kotak: उदय कोटक यांनी दिला मोठा इशारा! गुंतवणूक आणि खर्च जपून करा; अन्यथा...

High Interest Rate: उदय कोटक यांनी अमेरिकेच्या किरकोळ महागाईचा दर मार्चमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त झाल्यानंतर आणि फेडरल रिझर्व्हकडून दर कपातीची आशा कमी झाल्यानंतर जागतिक गोंधळाचा इशारा दिला आहे.
Uday Kotak
Uday KotakSakal

Uday Kotak's Warning: उदय कोटक यांनी अमेरिकेच्या किरकोळ महागाईचा दर मार्चमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त झाल्यानंतर आणि फेडरल रिझर्व्हकडून दर कपातीची आशा कमी झाल्यानंतर जागतिक गोंधळाचा इशारा दिला आहे. उदय कोटक म्हणाले की, वाढलेले व्याजदर सहन करण्यास आपण सर्वांनी तयार असले पाहिजे.

अमेरिकेत वाढत्या महागाईमुळे व्याजदर कपातीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती वाढत आहेत. यामुळे संपूर्ण जगाला जास्त व्याजदर सहन करावे लागणार आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. त्यामुळे गुंतवणूक आणि खर्च जपून करा.

उदय कोटक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, अमेरिकेतील वाढत्या महागाईमुळे यूएस फेडरल रिझर्व्ह चिंतेत आहे. यामुळेच सर्व अपेक्षा असूनही फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केलेली नाही. त्याचा जागतिक परिणाम आपण लवकरच पाहणार आहोत.

Uday Kotak
Truong My Lan: जगातील सर्वात मोठी फसवणूक! अब्जाधीश महिलेला न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा; काय आहे प्रकरण?

इस्रायल आणि इराण यांच्यातील भू-राजकीय तणाव आणि जागतिक पुरवठा धक्क्यांमुळे ब्रेंट क्रूडच्या किमती सुमारे 90 डॉलरवर व्यवहार करत असताना कोटक यांनी ही माहिती दिली. मेक्सिकोसारख्या काही उत्पादकांनीही कच्च्या तेलाची निर्यात कमी केली आहे.

अमेरिकेला या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकांपूर्वी आपले साठे पुन्हा भरायचे आहेत. जे युक्रेनवर रशियाच्या आक्रमणादरम्यान संपले होते.

Uday Kotak
TCS Recruitment: टीसीएसमध्ये मोठी नोकर भरती; अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून हजारो फ्रेशर्सना संधी

कोटक यांच्या मते, आरबीआय व्याजदर स्थिर ठेवून महागाईशी लढण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारताचा जीडीपी 7 टक्के दराने वाढू शकतो. एप्रिलच्या अलीकडील धोरणात, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

रेपो दर 6.5 टक्के ठेवला आहे. RBI ला FY2025 मध्ये किरकोळ महागाई 4.5 टक्क्यांपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे पुढील धोरणांमध्ये दर कपातीची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com