Share Market Investment Tips
Share Market Investment TipsSakal

Share Market Today: शेअर बाजारात विक्रीचे संकेत; गुंतवणुकीसाठी 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Investment Tips: मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील सलग चार दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला. आयटी आणि एफएमसीजी शेअर्सच्या विक्रीमुळे बाजार घसरणीसह बंद झाले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 195.16 अंकांनी अर्थात 0.26 टक्क्यांनी घसरून बंद झाला.

Share Market Investment Tips (Marathi News): मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील सलग चार दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला. आयटी आणि एफएमसीजी शेअर्सच्या विक्रीमुळे बाजार घसरणीसह बंद झाले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 195.16 अंकांनी अर्थात 0.26 टक्क्यांनी घसरून 73,677.13 वर आणि निफ्टी 49.30 अंकांनी म्हणजेच 0.22 टक्क्यांनी घसरून 22,356.30 वर होता.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

शेअर बाजारात प्रॉफिट बुकींग पाहायला मिळू शकते. प्रमुख बाजार निर्देशांक कमकुवत सुरुवात करू शकतात. कारण जागतिक बाजारात विक्रीची नोंद होत आहे. गिफ्टी निफ्टीही 22400 पर्यंत घसरला आहे.

निफ्टी सपाट ट्रेंडसह उघडला आणि ट्रेडिंग सत्राच्या पहिल्या तासात खाली गेल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात त्यात सुधारणा झाली. मात्र शेवटी तो 49 अंकांनी घसरून बंद झाला.

डेली चार्टचा विचार केल्यास निफ्टी मागील आठवड्यात पाहिलेल्या 22300 च्या ब्रेकआउटची पुनरावृत्ती करण्याच्या प्रक्रियेत आहे. 22369 - 22264 च्या रेंजमध्ये दिसणारी आवर्ली मुव्हिंग एव्हरेज एक महत्त्वाचा सपोर्ट म्हणून काम करू शकते. जोपर्यंत निफ्टी हा सपोर्ट कायम ठेवण्यात यशस्वी होतो तोपर्यंत पुढील टप्प्यातील तेजी येण्याची शक्यता कायम राहील.

Share Market Investment Tips
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सचे शेअर्स सेन्सेक्स-निफ्टीमधून बाहेर पडणार का? डिमर्जरचा काय परिणाम होणार

निफ्टीसाठी 22460 - 22530 वर त्वरित रझिस्टंस दिसून येतो. आवर्ली मोमेंटम इंडिकेटर समतोल रेषेपर्यंत पोहोचला असला तरी तो नेगिटीव्ह क्रॉसओव्हर देत आहे. ही घसरण पूर्ण झाल्याचे लक्षण आहे आणि एकदा हे कंसोलीडेशन पूर्ण झाल्यावर अपट्रेंड पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

बँक निफ्टी हा निफ्टीपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. निफ्टीला आयटीकडून सपोर्ट मिळेपर्यंत ही स्थिती कायम राहील, अशी आशा आहे. 47350 - 47300 वर बँक निफ्टीला मजबूत सपोर्ट आहे, तर 48000 - 48200 वर रझिस्टंस दिसून येत आहे.

Share Market Investment Tips
Air India-Vistara Merger: एअर इंडिया अन् विस्तारा यांच्यातील प्रस्तावित विलीनीकरणाला मान्यता! काय आहेत अटी?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • इन्फोसिस (INFY)

  • टीसीएस (TCS)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com