Share Market Closing: 3 दिवसांच्या तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला, बँकिंग स्टॉक मध्ये...

चालू आठवड्यातील तिसऱ्या व्यवहारात भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला.
Share Market update
Share Market updateSakal

Share Market Closing 24 May 2023: चालू आठवड्यातील तिसऱ्या व्यवहारात भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. विशेषत: बँकिंग शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या प्रॉफिट बुकींगमुळे बाजार बंद झाला.

आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 208 अंकांनी घसरून 61,773 वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 62 अंकांनी घसरून 18,285 अंकांवर बंद झाला.

Share Market Closing 24 May 2023
Share Market Closing 24 May 2023Sakal

आजच्या व्यवहारात बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे. बँक निफ्टी घसरणीसह बंद झाले. याशिवाय धातू, इन्फ्रा, कमोडिटी क्षेत्रातील शेअर्समध्येही घसरण झाली आहे.

तर आयटी, ऑटो, एफएमसीजी, एनर्जी, फार्मा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्स वधारले आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक तेजीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट:

आजच्या ट्रेडिंग सत्रात बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 279.55 लाख कोटी रुपयांवर आले, जे मंगळवारी 279.78 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 23,000 कोटी रुपयांची घट झाली आहे.

Share Market update
Raghuram Rajan: रघुराम राजन यांना तयार करायची होती 10,000 रुपयांची नोट! का नाकारण्यात आली शिफारस?

'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ:

आजच्या व्यवहारात सन फार्मा 1.96 टक्के, आयटीसी 1.07 टक्के, इंडसइंड बँक 1.13 टक्के, टायटन कंपनी 1.05 टक्के, पॉवर ग्रिड 0.88 टक्के, मारुती सुझुकी 0.77 टक्के वाढीसह बंद झाले.

आणि टाटा मोटर्स 1.49 टक्क्यांनी, एचडीएफसी बँक 1.33 टक्क्यांनी, एचडीएफसी 1.23 टक्क्यांनी, बजाज फिनसर्व्ह 0.73 टक्क्यांनी घसरले.

मेटल-बँकिंग शेअर्समध्ये घसरण:

NSE वर निफ्टी मेटल निर्देशांक जवळपास 1.25 टक्क्यांनी घसरला. याआधी सलग दोन दिवस या क्षेत्रात खरेदी होताना दिसत होती. त्याचप्रमाणे बँकिंग निर्देशांकही जवळपास अर्धा टक्का घसरणीसह बंद झाला आहे.

निफ्टीमध्ये टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. सन फार्माचे शेअर्स, डॉ. रेड्डीजचे शेअर्स सर्वाधिक वाढले.

काल BSE सेन्सेक्स 18 अंकांनी वधारून 61,981 वर बंद झाला आणि निफ्टी देखील 19 अंकांनी वधारून 18,333 वर बंद झाला.

Share Market update
पाठ्यपुस्तकांत वह्यांची घुसखोरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com