Share Market Closing: सलग तिसऱ्या दिवशी बाजारात खरेदी; 'या' कारणांमुळे सेन्सेक्समध्ये 340 अंकांची वाढ

आज BSE सेन्सेक्स 340 अंकांनी वाढून 62,846 वर बंद झाला
share market
share market sakal

Share Market Closing 29 May 2023: सोमवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. त्यामुळे बाजारातील प्रमुख निर्देशांक सलग तिसऱ्या दिवशी तेजीसह बंद झाले. आज BSE सेन्सेक्स 340 अंकांनी वर चढत 62,846 वर बंद झाला आणि निफ्टी जवळपास 100 अंकांनी वाढून 18,598 वर बंद झाला.

बाजारातील तेजीत वित्तीय, वाहन, धातू क्षेत्रातील शेअर्स आघाडीवर होते. याआधी शुक्रवारी भारतीय बाजारात तेजी दिसून आली. BSE सेन्सेक्स 629 अंकांच्या वाढीसह 62,501 वर बंद झाला.

शेअर बाजारातील तेजीची कारणे:

  • जागतिक बाजारातून चांगले संकेत

  • अमेरिकेला कर्जाच्या संकटातून दिलासा

  • एफआयआयच्या खरेदीमुळेही बाजारात तेजी दिसून आली

  • बँकांनी चौथ्या तिमाहीत ;चांगले निकाल जाहीर केले

Share Market Closing 29 May 2023
Share Market Closing 29 May 2023Sakal
share market
Debit Card EMI: क्रेडिट कार्ड नाही, टेन्शन घेऊ नका; आता ATM कार्डवर भरता येणार EMI, असा करा अर्ज

सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती:

सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती पाहिली तर आज गुंतवणूकदारांनी चांगला पैसा कमावला आहे. सेन्सेक्सच्या 30 पैकी 20 शेअर्स वाढीसह आणि 10 शेअर्सच्या घसरणीसह बंद झाले आहेत.

दुसरीकडे, निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 34 शेअर्स वाढीसह बंद झाले. त्याचे 16 शेअर्स घसरणीसह बंद झाले आहेत.

आज, निफ्टीचे आयटी आणि तेल आणि वायू निर्देशांक वगळता, इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीसह बंद झाले आहेत. कंज्यूमर शेअर्समध्ये सर्वाधिक 1.3 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. याशिवाय वित्तीय सेवा 1.11 टक्‍क्‍यांनी व मेटल शेअर्स 0.94 टक्‍क्‍यांच्या तेजीसह बंद झाले.

share market
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सेन्सेक्समधील 30 पैकी 20 शेअर्स तेजीसह बंद झाले, ज्यामध्ये M&M 3.71 टक्क्यांनी व टायटन 2.5 टक्क्यांनी वधारले. टाटा स्टील 1.88 टक्क्यांनी, एसबीआय 1.55 टक्क्यांवर बंद झाले.

या व्यतिरिक्त अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, आयटीसी, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, नेस्ले, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, एल अँड टी आणि अॅक्सिस बँकेचे शेअर्स तेजीसह बंद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com