Share Market Today: आजच्या व्यापार सत्रात बजाज ऑटो, मारुतीसह कोणते शेअर्स मिळवून देतील नफा; काय सांगतात तज्ज्ञ?

अमेरिकन बाजारातून मिळालेल्या संकेतांअभावी गुंतवणूकदारांनी बुधवारी सावधगिरीने व्यवहार केला.
Share Market Investment Tips
Share Market Investment Tips sakal
Updated on

Share Market Investment Tips: बुधवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्स सपाट बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 33.01 अंकांनी म्हणजेच 0.05 टक्क्यांच्या घसरणीसह 65446.04 वर बंद झाला. तर निफ्टी 9.50 अंकांच्या अर्थात 0.05 टक्क्यांच्या वाढीसह 19398.50 च्या पातळीवर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

अमेरिकन बाजारातून मिळालेल्या संकेतांअभावी गुंतवणूकदारांनी बुधवारी सावधगिरीने व्यवहार केल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले.

शिवाय, नुकत्याच झालेल्या तेजीमुळे बाजार आधीच ओव्हरबॉट झोनमध्ये होता आणि म्हणूनच बुधवारी निवडक शेअर्स आणि सेक्टर्समध्ये प्रॉफिट बुकींग सुरू राहिली.

तांत्रिकदृष्ट्या विचार केल्यास निफ्टी 19320 -19435 च्या रेंजमध्ये ट्रेडिंग करत आहे. तो फक्त छोट्या रेंजमध्ये फिरताना दिसेल. बुल्ससाठी, 19435 ही तात्काळ ब्रेकआउट लेव्हल असेल.

याच्या वर गेल्यावर निफ्टीमध्ये 19500-19525 पर्यंत तेजी दिसून येते. पण, जर तो 19320 च्या खाली घसरला तर विक्रीचा दबाव वाढण्याची शक्यता आहे.

यानंतर निफ्टी 19250-19200 पर्यंत घसरू शकतो. कॉन्ट्रा ट्रेडर्स 35 पॉइंट्सच्या स्टॉप लॉससह 19200 जवळ खरेदीचा विचार करु शकतात असेही ते म्हणाले.

Share Market Investment Tips
Cibil Score: सिबिल स्कोअर खराब आहे? आता फक्त कर्जच नाही तर सरकारी बँकेत नोकरी मिळणेही होणार अवघड

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • डिव्हीस लॅब (DIVISLAB)

  • एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

  • मारुती (MARUTI)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • पीएनबी (PNB)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Share Market Investment Tips
manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या अशांतपर्वाचा घटनाक्रम जाणून घेऊया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com