Share Market Opening: शेअर बाजाराची खराब सुरुवात; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

जागतिक बाजारातील अस्थिर परिस्थितीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीही किंचित घसरणीसह उघडले.
share market
share market sakal

Share Market Opening 13 April 2023: गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजाराची खराब सुरुवात झाली. जागतिक बाजारातील अस्थिर परिस्थितीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीही किंचित घसरणीसह उघडले.

TCS, INFOSYS, TECH MAH सह इतर प्रमुख क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. तर फार्मा, ऑटो आणि एफएमसीजी शेअर्स तेजीत आहेत.

BSE सेन्सेक्स 115.86 अंकांच्या म्हणजेच 0.19 टक्क्यांच्या घसरणीसह 60,276.91 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

त्याचप्रमाणे, NSE निफ्टी 31.45 अंकांच्या म्हणजेच 0.18 टक्क्यांच्या घसरणीसह 17,780.95 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. इंडसइंड बँकेचा शेअर निफ्टीमध्ये 2.46 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक व्यवहार करत होता.

'या' शेअर्समध्ये घसरण :

सेन्सेक्सवर, इंडसइंड बँक सर्वाधिक 2.46 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे एचसीएल टेक 2.03 टक्क्यांनी, टेक महिंद्रा, इन्फोसिस 1.90 टक्क्यांनी आणि टीसीएस 1.34 टक्क्यांनी घसरले.

'या' शेअर्समध्ये तेजी :

अपोलो हॉस्पिटल निफ्टीवर सर्वाधिक 1.56 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे ब्रिटानिया, महिंद्रा अँड महिंद्रा, ओएनजीसी, एचडीएफसी लाईफमध्ये 1.23 टक्के तेजीसह व्यवहार करत आहेत.

share market
Reserve Bank Of India: RBI चा कर्जदारांना मोठा दिलासा, कर्ज चुकवले तर आता होणार...

आज अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरत आहेत. सेन्सेक्समधील 30 पैकी 12 कंपन्यांचे शेअर्स घसरत आहेत. टेक, बँकिंग आणि फायनान्स शेअर्समध्ये घसरण होत आहे.

BSE India
BSE IndiaSakal

इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. दुसरीकडे, टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि विप्रो सारख्या आयटी कंपन्या सुरुवातीच्या व्यापारात 1-1 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण आहे.

share market
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आज बाजारासाठी महत्त्वाच्या गोष्टी :

  • अमेरिकेत महागाई कमी झाली पण फेडला मंदीची भीती आहे

  • डाऊ 40 अंकांनी घसरला, Nasdaq 100 अंकांनी घसरला

  • मार्चमध्ये सीपीआय 5.66% पर्यंत घसरला, 15 महिन्यांतील सर्वात कमी महागाई

  • TCS चा निकालामुळे निराशा, इन्फोसिसचा निकाल आज संध्याकाळी

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे लक्ष टीसीएस, इन्फोसिस, वेदांत आणि ब्रिटानिया यांसारख्या शेअर्सवर असेल.

सर्वात मोठी आयटी कंपनी आणि शेअर बाजारातील दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी TCS ने बुधवारी निकाल जाहीर केले. आज दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचा निकाल लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com