Share Market Opening: निफ्टी-सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

सेन्सेक्स सुमारे 600 अंकांच्या घसरणीसह उघडला आहे.
Share Market latest updates today
Share Market latest updates today Sakal

Share Market Opening 5 May 2023: देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात आज जोरदार घसरणीसह झाली असून सेन्सेक्स सुमारे 600 अंकांच्या घसरणीसह उघडला आहे. यामध्ये जवळपास 1 टक्‍क्‍यांच्या घसरणीसह व्यवसाय सुरु झाला.

एनएसईचा निफ्टीही जवळपास 150 अंकांची घसरणीसह उघडला. आजच्या मोठ्या घसरणीमागे मुख्य कारण एचडीएफसीचा शेअर आहे आणि तो 5 टक्क्यांच्या घसरणीने उघडला.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 14 शेअर्स तेजीसह आणि 16 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. याशिवाय निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 23 शेअर्स तेजीसह तर 26 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

BSE India
BSE IndiaSakal

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सेन्सेक्सच्या सुरुवातीच्या व्यवहारात, एचडीएफसीचा शेअर सर्वाधिक 4.32 टक्के घसरला आहे. त्याचप्रमाणे एचडीएफसी बँक 4.28 टक्के, इंडसइंड बँक 1.08 टक्के आणि टाटा स्टील 0.63 टक्क्यांनी घसरले.

याशिवाय बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, एनटीपीसी, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा आणि इन्फोसिस शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

Share Market latest updates today
Go First Airlines: गो फर्स्टच्या अडचणीत वाढ, 20 विमानांची नोंदणी रद्द करण्याची केली मागणी, कारण...

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

सेन्सेक्सवर आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, अॅक्सिस बँक, एसबीआय, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक, पॉवरग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, मारुती आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स तेजीत होते.

सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स 41.5 अंकांनी म्हणजेच 0.23 टक्क्यांनी घसरून 18,243.50 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून शुक्रवारी दलाल स्ट्रीटची सुरुवात नकारात्मक होऊ शकते असे संकेत मिळाले होते.

आशियाई शेअर बाजारात तेजी, डॉलरमध्ये घसरण:

शुक्रवारी आशियाई शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. मात्र, अमेरिकेतील बँकिंग क्षेत्राशी निगडीत चिंतेमुळे सोन्याच्या भावाने विक्रमी उच्चांक गाठल्याने गुंतवणूकदार घाबरले आहेत. तसेच डॉलरमध्ये घसरण दिसून आली.

Share Market latest updates today
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com