Share Market Opening: शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स 62900 वर, 'या' शेअर्समध्ये मोठी खरेदी

बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहेत.
Share Market
Share Market Sakal

Share Market Opening 9 June 2023: शुक्रवारी शेअर बाजार तेजीसह उघडला. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहेत. BSE सेन्सेक्स जवळपास 100 अंकांच्या वाढीसह 62,900 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे निफ्टीही 25 अंकांच्या वाढीसह 18,650 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

बाजारातील तेजीत ऑटो आणि रियल्टी क्षेत्र आघाडीवर आहेत. हिरो मोटोकॉर्प आणि टाटा मोटर्सचे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढणाऱ्या कंपन्यांमध्ये आहेत.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

टाटा मोटर्सचा शेअर सेन्सेक्सवर सर्वाधिक 0.95 टक्क्यांनी वाढला. त्याचप्रमाणे टायटनमध्ये 0.88 टक्के, पॉवर ग्रीडमध्ये 0.75 टक्के, अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 0.63 टक्के, एनटीपीसीमध्ये 0.63 टक्के आणि अॅक्सिस बँकेत 0.52 टक्के व्यवहार होत आहेत.

त्याचप्रमाणे मारुती, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक आणि महिंद्रा अँड महिंद्रा वाढीसह व्यवहार करत होते.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सन फार्मा, इन्फोसिस, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड आणि विप्रो हे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स 36 अंकांच्या किंवा 0.19 टक्क्यांच्या वाढीसह 18,756.50 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून दलाल स्ट्रीटची सुरुवात सकारात्मक होऊ शकते, असे संकेत मिळाले.

Share Market
Who is Pratik Doshi: देशाच्या अर्थमंत्र्यांच्या जावयाचे आहे गुजरात कनेक्शन; PM मोदींसोबत आहे...

सेन्सेक्सवर कंपन्यांची सुरुवात अशी झाली

आज सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी फक्त 9 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. 21 कंपन्यांच्या शेअर्सनी वाढीसह व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे.

टायटनचा शेअर सर्वात मजबूत स्थितीत आहे. इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, बजाम फायनान्स या शेअर्सनीही चांगली सुरुवात केली आहे.

हा आठवडा बाजारासाठी चांगला गेला:

हा आठवडा बाजारासाठी आतापर्यंत चांगला ठरला आहे. बुधवारी देशांतर्गत बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून देशांतर्गत बाजारात सुरू असलेल्या तेजीला गुरुवारी ब्रेक लागला.

गुरुवारी व्यवहार संपल्यानंतर बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स जवळपास 300 अंकांनी घसरला आणि 62,850 अंकांच्या खाली बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी सुमारे 0.50 टक्क्यांनी घसरला आणि 18,630 अंकांच्या जवळ आला.

Share Market
Shivrajyabhishek Sohala : हिंदवी स्वराज्याची स्थापना केवळ राजकीय सत्तेसाठी केली नव्हती, हा तर भारतीयत्वाचा अरुणोदय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com