Share Market Today Sensex, Nifty down at open, as Iran-Israel tensions escalate
Share Market Today Sensex, Nifty down at open, as Iran-Israel tensions escalate Sakal

Share Market Opening: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावात सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला; कोणते शेअर्स वधारले?

Sensex-Nifty Today: शुक्रवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवरही होत आहे. सकाळी सेन्सेक्स सुमारे 600 अंकांनी घसरला आणि 72000 च्या खाली आला.

Share Market Opening Latest Update 19 April 2024 (Marathi News): शुक्रवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवरही होत आहे. सकाळी सेन्सेक्स सुमारे 600 अंकांनी घसरला आणि 72000 च्या खाली आला. निफ्टीही 150 अंकांनी घसरून 21800 च्या पातळीवर आला आहे.

बाजारात सर्वाधिक विक्री आयटी, मेटल, ऑटो आणि पीएसयू बँकिंग शेअर्समध्ये होत आहे. निकालानंतर इन्फोसिसचे शेअर्स जवळपास 3 टक्क्यांनी घसरले आहेत.

Sensex Today
Sensex TodaySakal

जगभरातील गुंतवणूकदार चिंतेत

इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. इराणच्या एका वृत्तसंस्थेने दावा केला आहे की, इस्फहान शहरात स्फोट झाले आहेत. हे हल्ले इस्रायलने केले असल्याचे मानले जात आहे. इस्रायलच्या या कारवाईमुळे पश्चिम आशियातील दोन बलाढ्य देशांमध्ये थेट युद्ध सुरू होण्याची भीती वाढली आहे. या भीतीमुळे जगभरातील गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

Nifty Today
Nifty TodaySakal

आशियाई बाजारांचे मोठे नुकसान

हल्ल्याचे वृत्त समोर आल्यानंतर आशियाई बाजारांचे मोठे नुकसान होत आहे. सुरुवातीच्या व्यापारात जपानचा निक्केई सुमारे 2 टक्क्यांनी घसरला आहे. टॉपिक्स निर्देशांक 1.3 टक्क्यांनी घसरला आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी 1.8 टक्क्यांनी घसरला आहे. Kosdaq 1.34 टक्के घसरला आहे. हाँगकाँगमधील हँग सेंग फ्युचर्स देखील 1 टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे.

S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEX Sakal

अमेरिकन बाजाराची स्थिती काय आहे?

याआधी गुरुवारी अमेरिकन बाजारात संमिश्र कल होता. S&P 500 सलग पाचव्या सत्रात घसरला. Nasdaq 0.52 टक्क्यांनी घसरला. तर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेजमध्ये किंचित वाढ झाली. मात्र, आज हल्ल्याच्या वृत्तानंतर डाऊ जोन्स फ्युचर्स 2 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

Share Market Today Sensex, Nifty down at open, as Iran-Israel tensions escalate
Mukesh Ambani Birthday: 'या' चाळीत राहायचे मुकेश अंबानी, 100 लोकांसाठी होते चक्क एक बाथरूम

बीएसईचे कोणते शेअर्स तेजीत?

बीएसई सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी, आयटीसी आणि टायटनचे शेअर्स तेजीत होते, परंतु उर्वरित 28 शेअर्स घसरले आहेत. इफोसिसमध्ये सुमारे दोन टक्क्यांची घसरण झाली आहे. याशिवाय AXIS, L&T, Nestle सारखे शेअर्सही 1.50 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. NSE चे 1800 शेअर्स घसरत आहेत, तर 344 शेअर्स वधारत आहेत.

सर्वच क्षेत्रात मोठी घसरण

NSE च्या 2,214 शेअर्सपैकी 53 शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे, तर 40 शेअर्समध्ये अपर सर्किट आहे. 15 शेअर्सनी 52 आठवड्यांचा नीचांक गाठला आहे. बँक निफ्टी आज जवळपास 300 टक्क्यांनी घसरला आहे, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक 150 अंकांपर्यंत घसरले आहेत. याशिवाय आज निफ्टीच्या सर्व क्षेत्रात मोठी घसरण झाली आहे. ऑटो ते आयटी, हेल्थकेअर आणि ऑइलपर्यंत 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

Share Market Today Sensex, Nifty down at open, as Iran-Israel tensions escalate
Infosys : इन्फोसिसला ७९६९ कोटी नफा; भागधारकांना २८ रुपये लाभांश जाहीर

कोणत्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली?

सर्वात जास्त घसरलेल्या शेअर्समध्ये, NBCC इंडिया 3 टक्के, टाटा कम्युनिकेशन सुमारे 5 टक्के, Nykaa 3 टक्के, HPCL सुमारे 3 टक्के, BPCL 3.39 टक्के, कॅनरा बँक 2.89 टक्के आणि ICICI प्रुडेन्शियल 3.72 टक्क्यांनी घसरले आहेत.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.71 लाख कोटी रुपयांची घसरण

18 एप्रिल 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप रुपये 3,92,89,048.31 कोटी होते. आज म्हणजेच 19 एप्रिल 2024 रोजी बाजार उघडताच ते 3,89,17,408.51 कोटी रुपयांवर आले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 3,71,639.8 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com