सर्किट बेंच केवळ न्याय मिळवण्याचे साधन नाही, तर कोल्हापूरच्या वाटचालीतील नवा विकासबिंदू आहे.
एकीकडे विकेंद्रीकरणाची भाषा बोलायची आणि प्रत्यक्षात संरचना केंद्रीकृत ठेवायची, असा विसंवाद आपल्याकडे अनेक बाबतीत आढळतो. प्रशासकीय कामे असोत, वा न्यायालयीन; लोकांना वेगवेगळ्या कामांसाठी मुंबईकडे धाव घेणे भाग पडते.