ढिंग टांग :  आंदोलन!

farmer-agitation-bharat-bandh
farmer-agitation-bharat-bandh

कच्चिनसर्वेकर्मांता: परोक्षास्तेविशंकिता:
सर्वेवपुनरुत्सृष्ट: संसृष्टंचात्रकारणम।

- (नारद उवाच, सभापर्व, अध्याय ५)

अर्थ : ‘‘हे राजन! तुझ्या राज्यातील श्रमिक आणि कृषकांना, तुझे नीतीनियम ठाऊक आहेत ना? ते अनभिज्ञ तर नाहीत? त्यांच्याकडे तुझे लक्ष आहे ना? ते अधूनमधून धनविहीन तर होत नाहीत ना? राज्याचा विकास त्यांच्यावरच अवलंबून असतो, हे ध्यानी घे...’’

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सर्पसत्राच्या अंतिम चरणात
ऋषि वैशंपायनांनी धीरगंभीर
स्वरात सांगितले : ‘‘ऐक जनमेजया!
तुझ्या पूर्वसुरींची कथा...
भारतीय युद्धाच्या पूर्वकालात
इंद्रप्रस्थातील नव्याकोऱ्या मयसभेत
मुनिश्रेष्ठ नारदांनी केला होता
अलौकिक प्रश्नोपदेश,
प्रकांड ज्ञानी, साक्षेपी राजाला,
कुंतिनंदन धर्मराज युधिष्ठिराला.
त्याचे सार तेवढे जाणून घे,
कारण तूदेखील एक राजा आहेस,
त्याआधी एक कृषकही आहेस!

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या प्रदेशात जलाशये नाहीत,
ज्या प्रदेशातील प्रजा संभ्रमित असते,
ज्या प्रदेशातील श्रमिकांना मोल नसते,
ज्या प्रदेशातील कृषकांना प्रतिष्ठा नसते,
ज्या प्रदेशात युद्धमानतेचे डिंडिम वाजतात,
ज्या प्रदेशाच्या चतु:सीमांच्या
रक्षणार्थ निम्मेअधिक रुधिर सांडते,
ज्या प्रदेशातील युवकांना नीतीपाठांचा कंटाळा असतो,
ज्या प्रदेशातील वृद्धजन मोक्षाची प्रतीक्षा करतात,
त्या प्रदेशात-

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कितीही महावीर योद्धे असले,
कितीही बलिष्ठ अश्वसेना असली,
कितीही वेगवान रथ असले,
कितीही गोधन असले, अथवा
तेथल्या कीर्तीमान राजाने-
कितीही अश्वमेध वा राजसूय
यज्ञ संपन्न केले असले तरी
सारे काही अंतिमत: मातीमोल,
आणि इतिहासाच्या लेखी शून्यच!’’
जनमेजय गोंधळला, आणि
हात जोडून म्हणाला :
‘‘ऋषिवर, या गणनपट्टीवर
माझे राज्य कोठे आहे?
ते कसे आणि कोणी मोजावे?’’

त्यावर हसून ऋषिवर वैशंपायन म्हणाले :
‘‘जनमेजया! सर्पसत्रात गुंतलेल्या
तुझ्या कानांना प्रतिशोधाची
सळसळ तेवढी ऐकू येते आहे...
प्रजेचा आक्रोश तुझ्या कानांवर
पडणार तरी कधी आणि कसा?’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com