Dhing Tang
sakal
प्रति, मि. डोलांडतात्या, यांसी शि. सा. न. शालोम. मघाशीच हमासवर एकदम बाराशे क्षेपणास्त्रे डागण्याचा गुप्त प्लान आखून आलो. एकाच वेळी शत्रूच्या मुलखात मोबाइलचे स्फोट घडवून आणण्याचीही आमची योजना आहे. इराणच्या लष्कराला काहीही करून तेलविहिरींपाशी बोलवायचे, आणि त्यांचा फोन वाजवायचा-धडाम! दोन तासात युद्ध संपेल असे वाटते. बघू!